शेअर केलेला व्हिडिओ दोन भागात दाखवला आहेत. पहिल्या भागात हे जोडपे प्राण्याला भिंतीखालून सोडवण्याचा प्रयत्न करताना दाखवले आहेत. जोडप्याने खालची भिंत पोकळ केली. त्यांना वाटले की कदाचित आत कुठला साप अडकला आहे. त्यामुळे त्याने त्याच्या हातात काठीही ठेवली होती. पण, काही वेळाने त्यांना वेगळाच आवाज आला. तेव्हा पतीने पत्नीला सांगितले की तो साप नाही. मात्र, काही वेळाने त्यांना अस्वलाचे डोके दिसले. तितक्यात हे अस्वल तेथून बाहेर आलं.
अस्वलाला पाहताच दोघांनीही जीव वाचवण्यासाठी पळ काढला. दोघेही घराच्या आत पळू लागले. यावेळी पत्नीला मागे वळून अस्वल छिद्रातून बाहेर आले आहे का ते पाहिले. त्यानंतर अस्वलाने त्यांचा पाठलाग केला. कसा तरी जीव वाचवत हे दोघेही घरात पोहोचले. घराच्या दारात लावलेल्या कॅमेऱ्यात या हल्ल्याचा व्हिडिओ रेकॉर्ड झाला आहे. सोशल मीडियावर शेअर होताच तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. हा व्हिडिओ अत्यंत भयानक असल्याचं काहींनी सांगितलं.