नवी दिल्लीः इलेक्ट्रॉनिक प्रोडक्ट निर्माता कंपनी वेस्टर्न डिजिटल (Western Digital) कडून एक शानदार ऑफर दिली जात आहे. ही ऑफर वेस्टर्न डिजिटल ग्राहकांसाठी आहे. याच्या मदतीने ग्राहकांना ऑनलाइन कमाई करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी जास्त काही करण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला एका कॉन्टॅस्ट मध्ये सहभाग घ्यायचा आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या डिजिटल ग्राहकाला १ लाख रुपयाचे कूपन जिंकण्याची संधी आहे. सोबत ग्राहकाला १५० रुपयाचा गोल्ड बार जिंकता येवू शकतो. जर तुम्ही घरी बसून एक लाख आणि १५० ग्रॅम गोल्ड जिंकायचा असेल तर तुम्हाला Western Digital स्पर्धेत भाग घ्यावा लागेल.

कशी कराल ऑनलाइन कमाई
वेस्टर्न डिजिटल (Western Digital) कडून ६ महिन्यासाठी फेस्टिव्ह स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. याला “Share Your Memories” नाव दिले आहे. या फेस्टिव्हल सीजन सेलमध्ये वेस्टर्न डिजिटल SanDisk प्रोडक्टच्या खरेदीवर शानदार डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. जर तुम्हाला १२८ जीबी आणि २ टीबी पर्यंतचे प्रोडक्ट खरेदी करीत असाल तर तुम्ही या स्पर्धेत भाग घेवू शकतात. या स्पर्धेत दर महिन्याला दोन विजेते निवडले जातात. ज्याला एक लाख रुपये किंमतीचे व्हाउचर दिले जाते. याबदल्यात यूजर्स फिजिकल मार्केट प्लेस वरून एलजी इलेक्ट्रॉनिक्स कंज्यूमर ड्युरेबल प्रोडक्टला खरेदी करू शकतात.

कसे सहभागी होवू शकता
वेस्टर्न डिजिटल प्रोडक्ट खरेदी नंतर त्या प्रोडक्ट पॅकेजवर दिलेल्या क्यूआर कोडला स्कॅन करा. त्यानंतर https://www.shareyourmemory.in/ वर लॉगिन करा. यानंतर आवश्यक डिटेल्स टाका.

यानंतर तुम्हाला २० ते २०० शब्दात आपली हॅप्पी मेमरी एन्ट्री सबमिट करावी लागेल.

सबमिशन नंतर ज्यूरी दर आठवड्याला दोन विजेत्याची निवड करेल. ज्याला १ लाख रुपयाचे कूपन दिले जातील.

दर तीन महिन्याला एक विनरचे सिलेक्शन होईल. ज्याला १५० ग्रॅम गोल्ड बार दिला जाईल.

वाचाः Xiaomi च्या नव्या फोनमध्ये मिळेल iPhone 14 Pro चे जबरदस्त फीचर्स, लवकरच होणार लाँच

वाचाः Amazon ऑफर्सचा धुमाकूळ, महागडे स्मार्टफोन्स झाले खूपच स्वस्त, पाहा संपूर्ण लिस्टSource link

Leave a Reply

Your email address will not be published.