छत्रपती संभाजीनगर: शहरातील पुंडलिक नगर भागामध्ये राहणाऱ्या आर्थिकदृष्ट्या एका गरीब कुटुंबातील २३ वर्षीय मुलीला कुंडलीत मंगळ असल्याने तिचं लग्न जमत नव्हतं. यामुळे धर्मसंकटात सापडलेल्या पालकांची चिंता वाढली होती. मात्र, ओळखीतील अठरा वर्षाच्या मुलाच्या जन्मगुणांमुळे लग्न जुळलं. मुलीच्या वयापेक्षा चार वर्षे लहान वयाच्या मुलासोबत लग्नाला मंडपात वऱ्हाडी मंडळी जमली आणि घटनेची माहिती मिळताच मंगल कार्यालयामध्ये बालकल्याण समिती व पोलीस धडकली. यावेळी वऱ्हाडी मंडळींची एकच धांदल उडाली.

दरम्यान या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगर शहरातील पुंडलिक नगर भागामध्ये २३ वर्षीय पूजा कुटुंबीयांसोबत राहते. पूजाचे वडील खाजगी नोकरी करून घराचा उदरनिर्वाह चालवतात. दरम्यान, पूजा २३ वर्षाची झाल्यानंतर तिचं लग्न करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. यासाठी तिची पत्रिका जुळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, पूजाच्या कुंडलीमध्ये मंगळ असल्याचे सांगितला तसेच तिच्या लग्नासाठी अडचणी येऊ लागल्या यामुळे पूजाचे आई-वडील चिंतेत होते. दरम्यान, ओळखीतून बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार करणाऱ्या दाम्पत्याच्या मुलाला विवाहासाठी मुलगी बघण्याचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी १८ वर्षीय मुलासाठी मुलगी शोधणे सुरू असताना पूजाचा आणि त्या मुलाची लग्नपत्रिका जुळवण्याचा कार्यक्रम झाला. यामध्ये दोघांच्या लग्नपत्रिका जुळल्या व दोघांचे स्वभाव देखील जुळले यामुळे संकटात सापडलेल्या पूजाच्या कुटुंबीयांची चिंता मिटली. दोघांच्या कुटुंबीयांनी मुहूर्त ठरवला व विवाह सोहळ्याचे पुंडलिक नगर भागामध्ये एका कार्यालयात आयोजन करण्यात आलं होतं. या विवाह सोहळ्यासाठी सर्व नातेवाईकांना निमंत्रित देखील करण्यात आलं होतं.

किंजवडे ग्रामपंचायतीचा अनोखा फतवा, विवाह नोंदणीसाठी आता लावावी लागणार झाडे

दरम्यान २३ वर्षीय पूजाचा १८ वर्षीय मुलासोबत विवाह ठरला असल्याची माहिती बालकल्याण समितीच्या अॅडव्होकेट आशा शेरखाने कटके यांना मिळाली. शेरखाने या बालकल्याण समितीच्या कल्याण शेळके, दामिनी पथकाच्या निर्मला निंभोरे यांच्यासह विवाहसोहळा सुरू असलेल्या कार्यालयात दाखल झाल्या. दरम्यान, लग्न मंडपामध्ये पोलीस दाखल झाल्याचे पाहून नातेवाईकांच्या दरम्यान पोलिसांनी कायदा समजून सांगत लग्न थांबवले.

याबद्दल बोलताना बालकल्याण समितीच्या अध्यक्ष आशा शेरखाने कटके म्हणाल्या की कायद्यानुसार लग्नासाठी मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण आवश्यक आहे व मुलाचे वय २१ वर्षे असणे बंधनकारक आहे. असा कायदा असताना चुकीच्या वयात लग्न लावू नये यामुळे मुलांच्या शारीरिक व मानसिकतेवर परिणाम होतो. असा प्रयत्न कोणी केला तर त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा त्यांनी दिला.

कुणावर दुसऱ्याच्या दारात जायची वेळ येऊ देऊ नको, पंकजा मुंडेंचं अंबाबाईच्या चरणी मागणंSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *