नवी दिल्ली: देशभरात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. या काळात खरेदीदारांमध्ये सोने आणि चांदीची मागणी भरपूर वाढते. तुमच्या कुटुंबातही लग्नसराईचे वातावरण असेल आणि तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या भावात सातत्याने होत असलेल्या वाढीला आज ब्रेक लागला आहे. अशा परिस्थितीत आज तुम्हाला स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी मिळत आहे. जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदीचा विचार करत असाल, तर तुमच्या शहरात आज ते दर कोणत्या दराने उपलब्ध आहे, हे खरेदीला जाण्यापूर्वी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. यामुळे आज खरेदी तुम्हाला किती फायद्याची होईल, याची तुम्हाला कल्पना येईल.

सोने-चांदीचे दर
आज २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी सोने आणि चांदीचे भाव स्थिर राहिले आहेत. ३ फेब्रुवारी २०२३ रोजी परिपक्व होणारे सोन्याचे दर मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (एमसीएक्स) ३६ रुपये किंवा ०.०६ टक्क्यांनी किरकोळ वाढून रु. ५७ हजार ००५ प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहेत. याशिवाय ३ मार्च २०२३ रोजी परिपक्व होणाऱ्या चांदीच्या फ्युचर्समध्ये २०२३ रुपये किंवा ०.३० टक्क्यांनी वाढ झाली आणि एमसीएक्सवर चंदनी ६८ हजार ७४५ प्रति किलोच्या किमतीत विकले जात आहे.

श्रीमंत व्हायचे असेल तर फॉलो करा या महत्त्वाच्या टिप्स, त्यांना स्वीकारल्यास व्हाल कोट्याधीश

लक्षात घ्या की २५ जानेवारी रोजी बाजार बंद होताना सोने आणि चांदीच्या किमती अनुक्रमे ५६ हजार ९६९ रुपये प्रति १० ग्रॅम आणि ६८ हजार ५४२ रुपये प्रति किलोवर स्थिरावला होता.

आगामी अर्थसंकल्पात गृहकर्जधारकांना मिळणार सवलतींची भेट, मध्यमवर्गीयांना असा होईल फायदा

मुंबईत आज सोन्याचा भाव
जर तुम्ही मुंबई सोने किंवा चांदी खरेदी करत असाल तर २४ कॅरेट सोने खरेदीसाठी ५७ हजार ४९० रुपये प्रति १० ग्रॅम खर्च करावा लागेल तर २२ कॅरेट सोने ५२ हजार ७०० रुपये प्रति १० ग्रॅम दराने विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Income Tax Refund: तुमच्या खात्यात अजूनही आला नाही आयटीआर परतावा? मग नक्की वाचा

२४ कॅरेट सोने सर्वात शुद्धतेचे (९९.९ टक्के) मानले जाते आणि त्यात इतर कोणत्याही धातूची मिसळणं केली जात नाही. यापासून सोन्याची नाणी आणि बार तयार केला जातो. तर २२ कॅरेट सोने दागिने बनवण्यासाठी चांगले मानले जाते. २ कॅरेट सोन्याचे दागिने बनवण्यासाठी २२% सोने आणि दोन भाग चांदी, निकेल किंवा इतर कोणत्याही धातूचा वापर केला जातो. दरम्यान, २०२३ मध्ये भारतीय बाजारात सोन्याची किंमत ५८ हजार ते ६१ हजार प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर जाण्याची शक्यता आहे. जगभरातील केंद्रीय बँका सोन्यात सतत गुंतवणूक करत असल्यामुळे सोने दरात यंदा विक्रमी वाढ होईल, से कमोडिटी तज्ञांचे म्हणणे आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *