MCX वर सोन्या-चांदीचे दर कमी झाले
सराफा बाजारात अलीकडेच सोने-चांदीच्या दरात काही ठिकाणी तेजी तर काही ठिकाणी घसरण दिसून येत आहे. तर वायदे बाजारात मौल्यवान धातूच्या किमती कमी झाल्याचे दिसून आले. सोमवारी देशांतर्गत सोन्या आणि चांदीचे वायदे लाल रंगात व्यवहार करत आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचे डिसेंबर फ्युचर्स ८७ रुपये किंवा ०.१५ टक्क्यांनी कमी होऊन ५९,६६५ रुपये प्रति १० ग्रॅम झाले तर, चांदीचा डिसेंबर वायदा ५६५ रुपये किंवा ०.८१ टक्क्यांनी घसरून ६९,४६७ रुपये प्रति किलोवर झाले आहेत.
सराफा बाजारात सोने-चांदी झाले स्वस्त
बुलियन मार्केटच्या वेबसाइटनुसार, आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५९,८४० असून चांदी ६९,५९० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. अशा स्थितीत मुंबईत २२ कॅरेट सोन्याची किंमत ५४,७५३ रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ५९,७३० प्रति १० ग्रॅम आहे.
मिस्ड कॉल करून जाणून घ्या सोन्या-चांदीचे भाव
ibja द्वारे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या शनिवार आणि रविवार या दिवशी सोन्या-चांदीचे दर जाहीर केले जात नाहीत. २२ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांच्या रिटेल किमती जाणून घेण्यासाठी तुम्ही ८९५५६६४४३३ वर मिस्ड कॉल केल्यावर काही वेळात एसएमएसद्वारे दर समजतील. याशिवाय तुम्ही सतत अपडेट्ससाठी www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.
लक्षात घ्या की इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने (ibja) जाहीर केलेल्या किमती वेगवेगळ्या शुद्धतेच्या सोन्याच्या प्रमाणित किमती असतात ज्या टॅक्स आणि मेकिंग चार्जेसच्या आधीच्या आहेत. ibja ने जारी केलेले दर देशभरात सार्वत्रिक आहेत परंतु त्यांच्या किमतींमध्ये GST समाविष्ट नसतं. अशा स्थितीत दागिने खरेदी करताना, सोने किंवा चांदीचे दर जास्त असतात कारण त्यात कर समाविष्ट केले जातात.