नवी दिल्ली : आज देशभर धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाणार आहे. धनत्रयोदशी म्हणजे धन तेरसच्या दिवशी सोन्या आणि चांदीह्या खरेदी करणे चांगली मानली जाते. तर या दिवशी सोनं खरेदीला विशेष महत्त्व असून यादिवशी ग्राहक सोन्या-चांदीच्या खरेदीला प्राधान्य देतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही आज सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी घसरण पाहायला मिळत असून मौल्यवान धातूच्या किमती स्वस्त झाल्या आहेत.जाणून घ्या देशभरातील प्रमुख शहरातला सोन्याचा दर कायजागतिक बाजारात सोन्या-चांदीचे भाव पुन्हा तेजीत परतताना दिसत असले तरी देशांतर्गत बाजारात भावांना साथ मिळत नाही. वाढत्या किमतीमुळे मागणीत घट झाली आहे. मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,७०० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २५ कॅरेट सोन्याचा दर ६०,७६० रुपये प्रति १० ग्रॅम असून चांदीचा दर ७३,२०० रुपये प्रति किलो आहे.
शहर | १ ग्रॅम (२२ कॅरेट) | ८ ग्रॅम (२४ कॅरेट) | १ ग्रॅम (२२ कॅरेट) |
अहमदाबाद | ५,७६७ | ४६,१३६ | ६,१०८ |
दिल्ली | ५,८२६ | ४६,६०८ | ६,१७३ |
चंदीगड | ५,९९६ | ४७,९६८ | ६,३६४ |
मुंबई | ५,८७६ | ४७,००८ | ६,२३३ |
पुणे | ५,८२० | ४६,५६० | ६,१७४ |
कोलकाता | ५,८५४ | ४६,८३२ | ६,२११ |
जयपूर | ५,८०० | ४६,४०० | ६,१४७ |
आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ४०० रुपयांनी घसरला तर चांदीच्या दरातही प्रतिकिलो ३०० रुपयांची घट झाल्याचे सांगण्यात येत आहे. लक्षात घ्या की सोन्याचा भाव आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा कमी झाला तर चांदीच्या दरातही दिलासा मिळाला आहे. ११ मे २०२३ रोजी सोन्याने ६१,५८५ रुपये प्रति १० ग्रॅमची सर्वकालीन उच्चांकी पातळी गाठली होती. तसेच ४ मे २०२३ रोजी चांदीचा भाव ७६,४६४ रुपये प्रति किलोच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचला होता.जागतिक बाजारात सोने-चांदी तेजीतआंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये आज सोन्या-चांदीच्या दरात जोरदार वाढ नोंदवली गेली आहे. जागतिक बाजारात सोने ८.९२ डॉलरच्या वाढीसह १९५९.७५ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे. तर चांदी $०.१७ वाढून $२२.७२ प्रति औंसवर ट्रेंड करत आहेत.