झारखंडः भारतातील अनेक असे प्रदेश आहेत ज्यांचं उत्पन्न निसर्गावर अवलंबुन असतं. जंगल, नदी, तलाव यासारख्या नैसर्गिक संपत्तीद्वारे आपली गुजराण करत असतात. भारतात एक अशी नदी आहे जिच्यामुळं तिथे राहणारे लोकांना कमाईचे साधन मिळाले आहे. भारतातील एका नदीत सोनं वाहून येतं. आणि तिथले नागरिक हे सोनं काढून विकतात आणि पैसे कमवतात. दरम्यान, या नदीत सोनं कुठून येते हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे. वैज्ञानिकांनीही यावर संशोधन केलं आहे. मात्र, हे रहस्य अद्याप उलगडलं नाहीये.

भारतातील ही गोल्डन रिव्हर झारखंड राज्यातून वाहत असून या नदीचे नाव स्वर्णरेखा नदी असं आहे. या नदीत सोनं सापडतं त्यामुळं तिला स्वर्णरेखा असं म्हटलं जातं. ही नदी झारखंडसह पश्चिम बंगाल आणि ओडिशामधूनही वाहते. स्वर्णरेखा नदीचे उगमस्थान झारखंड जिल्ह्यातील रांचीयेथून १६ किलोमीटर दूर होते. त्यानंतर ही नदी थेट बंगालच्या खाडीला जाऊन मिळते.

वाचाःकडुलिंब, मंतरलेले पाणी आणि दुवा…; गोवरच्या अंधश्रद्धेतून तीन बालकांचा मृत्य

झारखंडमधून स्वर्णरेखा नदी ज्या परिसरातून वाहते तेथील लोक भल्या पहाटेच नदीच्या किनाऱ्यावर पोहोचतात. त्यानंतर नदीची वाळू गाळून त्यातून सोनं जमा करतात. यातील काही लोकं अनेक पिढ्यांपासून सोनं जमा करतात. इतकंच नव्हे तर नदीतून सोनं काढण्यासाठी पुरुष आणि महिलांसोबत लहान मुलंही जातात.

वाचाः मुलगी, जावई, मावशीसह संपूर्ण कुटुंब रमलेय चोरीत; पण एक चूक झाली अन् सापडले पोलिसांच्या जाळ्यात

स्वर्णरेखा नदीत सोनं कुठून येतं याचं गुढ अद्याप उकललं नाहीये. स्वर्णरेखा नदी डोंगर-दऱ्यातून वाहत येते आणि त्यामुळं इथूनच सोन्याचे कण यात वाहून येतात. पण याबाबत काहीच ठोस माहिती सापडली नाहीये. मात्र, स्वर्णरेखा नदीत सोनं करकरी नदीतूनच येत असल्याचा दावा केला जात आहे.

वाचाः गोखले पुलासंदर्भात नवीन अपडेट, हलकी वाहने आणि प्रवाशांसाठी होणार खुला, पण…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *