जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत असणाऱ्या उपबाजारात कांद्या प्रमाणे आता डाळिंबाचे देखील लिलाव मोठ्या प्रमाणावर होऊ लागले आहेत. त्यात शुक्रवारी झालेल्या बाजार.लिलावात अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील शेतकरी विवेक अजिनाथ रायकर यांच्या डाळिंबास वीस किलोच्या एका क्रेटला तब्बल ९ हजार ५०० रुपयांचा भाव मिळाला आहे. त्यामुळे डाळींब उत्पादक भलताच खुश झाला आहे. त्या खालोखाल त्याच्या दुसऱ्या डाळिंबाच्या एका क्रेटला ७ हजार ६०० रुपयांचा भाव मिळाला आहे. त्यामुळे जुन्नर बाजार समितीत डाळिंबाची चलती पाहायला मिळत आहे. या बाजारात डाळींब विक्रीसाठी आले होते. शनिवारी डाळिंबाची आवक घटल्याने एवढ्या प्रमाणात मोठा बाजार मिळाला आहे.
या बाजार समितीत पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा, शिरूर, अहमदनगर या ठिकाणाहून शेतकरी डाळिंब विक्रीसाठी येत असतात. त्यामुळे पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यासाठी ही महत्त्वाची बाजार पेठ आहे. या बाजार समितीत फळ लिलाव मोठ्या प्रमाणावर केले जातात. हे मार्केट कांदा लिलावासाठी प्रसिद्ध आहे, पण डाळिंबाला एवढा भाव मिळाल्याने हे मार्केट चांगलेच चर्चेत आले आहे. डाळिंबासाठी ही बाजारपेठ आता चर्चेत येऊ लागली आहे.
वीस किलोच्या एका क्रेट ला ९५०० रुपये तर एक नंबर डाळिंबास वीस किलोस ७५०० व दोन नंबर डाळिंबास २० किलोस ६५०० रुपये बाजार भाव तर तीन नंबर वीस किलो डाळिंबास ५५०० रुपये दर मिळाला तर चार नंबर डाळींबास २००० रुपये मिळाला असून मार्केट मध्ये १७३२ क्रेट विक्रीसाठी आले होते.