म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे, मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील सुमारे सव्वालाख गृहनिर्माण सोसायट्यांना आणि त्यातील रहिवाशांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, तक्रारींचे निराकरण करण्यासाठी आता सहकार विभागाने नियमावली किंवा कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता समिती नियुक्त करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून तक्रारी सोडविण्यासाठी कोणती कार्यपद्धती असावी हे निश्चित केले जाणार आहे. तक्रारी सोडविण्याची कार्यपद्धतीमध्ये सुसूत्रता येणे शक्य होणार आहे. नव्या वर्षात त्याची अंमलबजावणी होणार आहे.

पुण्यासह राज्यातील सहकारी गृह निर्माण सोसायट्यांमधील सदस्यांना त्यांच्या समस्या घरबसल्या सोडविता याव्यात यासाठी सहकार विभागाने पुढाकार घेतला आहे. ‘सहकार संवाद’ नावाचे ऑनलाइन पोर्टल कार्यान्वित केले आहे. या पोर्टलद्वारे राज्यातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांसह तेथील रहिवाशांना तक्रारी करता येणार आहे. तसेच त्याचा पाठपुरावाही करता येणे शक्य होणार आहे.

एसओपीसाठी समिती

– गृहनिर्माण सोसायट्या आणि त्यामध्ये राहणाऱ्या रहिवाशांना विविध तक्रारी आहेत.
– तक्रारींचे निराकरण करताना त्यात कोणताही पक्षपात होऊ नये, कोणावरही अन्याय होऊ नये
– राज्यातील सर्वच विभागातील सहकारी विभागातील अधिकाऱ्यांकडून तक्रारी सोडविताना सूसुत्रता असावी
– एकाच नियमाचा आधार असावा
– सहकार विभागातील तीन उपसंचालक तसेच गृहनिर्माण सोसायट्यांमधील एक अशा चार जणांची समिती तयार केली
– समितीकडून सुमारे २३ प्रकारच्या तक्रारींचा अभ्यास करणार

राज्यात सव्वालाख गृहनिर्माण सोसायट्या कार्यरत आहेत. त्या सोसायट्यांमधील रहिवाशांच्या अनेक तक्रारी असतात. त्या २३ प्रकारच्या तक्रारी सोडविण्यासाठी सर्वच उपनिबंधकांकडे एकच कार्यपद्धती असावी यासाठी नियमावली तयार करण्यात येणार आहे. त्याकरिता चार जणांची समिती नियुक्त केली असून त्यांचा अहवाल आल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

अनिल कवडे, आयुक्त, सहकार विभाग

Pune Accident Video: पुण्यात अंगावर शहारे आणणारा अपघात: टेम्पो चालकाचं नियंत्रण सुटलं, सात वाहनांना उडवलं

तक्रारी कोणत्या स्वरुपाच्या

सोसायट्यांमध्ये किंवा रहिवाशांकडून साधारणत: शेअर सर्टिफिकेट न देणे, सदस्य करून न घेणे, घराचा हस्तांतरणाचा दाखला दिला जात नाही. पुनर्विकास करण्यात अनेक अडथळे, त्यात पारदर्शकता नाही. अशा विविध २३ स्वरुपाच्या तक्रारींचा अभ्यास ही समिती करणार आहे. त्या तक्रारी सोडविण्याच्या प्रक्रियेवर सहकार विभाग लक्ष ठेवणार आहे. त्यासाठी ही एसओपी उपयुक्त ठरणार आहे.
Pune News: जालन्याचे माजी पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची पुण्यात बदली; मनोज जरांगे संतापले

दोन महिन्यात सातशे तक्रारी

‘सहकार संवाद’ या ऑनलाइन पोर्टलवर गेल्या दोन तीन महिन्यात सुमारे सातशे तक्रारी आल्या आहेत. त्यात सर्वाधिक तक्रारी मुंबई आणि उपनगरांमधून आल्या असून त्या ४१७ एवढ्या आहेत. त्या पाठोपाठ कोकण ठाणे भागातून १४० तर पुण्यातून १३६ तक्रार नोंदविल्या गेल्या आहेत, अशी माहिती सहकार विभागाने दिली.

गुरुजींचे भवितव्य टांगणीला! तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मुदतवाढीचे अर्ज सादर करण्यात दिरंगाई

फोडाफोडीत लक्ष देणाऱ्या सरकारचं केंद्राच्या व्यापारी धोरणाशी संवाद नाही, शरद पवारांची टीका

Read Latest Maharashtra News And Marathi News



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *