नवी दिल्ली: इंग्लंडमधील थर्स्क येथे १८ व्या शतकात थॉमस बस्बी नावाचा एक माणूस राहत होता. त्याचा डॅनियल ऑटी नावाचा एक खास पार्टनर होता. हे दोघेही बनावट नाणी बनवण्याचे बेकायदेशीर काम करायचे, असे सांगण्यात येते. डॅनियल हा थॉमसचा अत्यंत चांगला मित्र तर होताच. पण, थॉमसने डॅनियलची मुलगी एलिझाबेथशी लग्नही केले होते. पुढे ही मैत्री आणखीनच घट्ट होत गेली. रोज काम संपल्यावर हे दोघे थर्स्क येथील त्यांच्या आवडत्या बारमध्ये एकत्र दारु प्यायला बसायचे आणि तिथे भरपूर मद्यपान करायचे.

थॉमस नेहमी त्या बारमध्ये एकाच खुर्चीवर बसायचे. त्यामुळे त्याला त्या खुर्चीविषयी एक विशेष आसक्ती होती. जर त्या खुर्चीत इतर कोणी बसलं तर थॉमस त्या व्यक्तीशी भांडायचा. मग, बळजबरीने त्या व्यक्तीला त्या खुर्चीवरुन हटवून तो स्वतः त्यात बसायचा. पण, हीच खुर्ची पुढे जाऊन अनेकांचे प्राण घेईल अशी कल्पनाही कोणी केली नसेल.

हेही वाचा –शाळेत का जात नाहीस, आईचा ओरडा असह्य, पुण्यात अल्पवयीन मुलाने शाळेतच जीवन संपवलं…

१७०२ मध्ये एके दिवशी त्या बारमध्ये थॉमस आणि डॅनियल यांच्यात कशावरुन तरी भांडण झालं आणि हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचलं. यानंतर डॅनियल थॉमसला चिडवण्यासाठी त्याच्या त्या आवडत्या खुर्चीत बसला. हे पाहून थॉमसचा पारा चढला. त्याने रागाच्या भरात डॅनियलचा म्हणजेच त्याच्या सासऱ्याचा खून केला.

या घटनेनंतर पोलिसांनी थॉमसला डॅनियलच्या हत्येप्रकरणी अटक केली. त्यानंतर थॉमसला सासऱ्याच्या हत्येच्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. त्याच्या फाशीचा दिवस आला. ज्या दिवशी थॉमसला फाशी दिली जाणार होती, त्या दिवशी त्याला त्याची शेवटची इच्छा विचारण्यात आली. फाशी देण्यापूर्वी आपली शेवटची इच्छा व्यक्त करताना थॉमसने सांगितले की, थिर्स्क येथील बारमध्ये त्याच्या आवडत्या खुर्चीत बसून त्याला त्याचं शेवटचे जेवण करायचं आहे.

थॉमसची ही अखेरची इच्छा मान्य करण्यात आली आणि त्याला त्याच बारमध्ये नेण्यात आले. त्या खुर्चीत बसून त्याने त्याचं अखेरचं जेवण केलं. पण, जेवण संपवून जेव्हा तो उभा राहिला तेव्हा त्याने जे शब्द उद्गारले ते खरे ठरले, असं म्हटलं जातं. तो म्हणाला, ‘जो कोणी माझ्या खुर्चीत बसण्याची हिंमत करेल तो मरेल’. तेव्हापासून ही खुर्ची शापित झाली आहे, असं म्हणतात.

हेही वाचा –३० वर्षांचा झालोय, माझं लग्न लावून द्या, रिअल लाईफ पोपटलाल अर्ज घेऊन पोलिसांत

पायलट खुर्चीत बसला अन् काहीच वेळात

मिळालेल्या माहितीनुसार, दुसऱ्या महायुद्धादरम्यान रॉयल एन्फोर्सर्सचे दोन पायलट त्या बारमध्ये आले आणि त्याच शापित खुर्चीवर बसले. त्यानंतर ते दोघे बारमधून बाहेर येताच त्यांच्या कारला अपघात झाला आणि दोन्ही पायलटचा मृत्यू झाला. यानंतर या खुर्चीवर जी कोणती व्यक्ती बसली त्याचा गूढ मृत्यू झाला. या वारंवार होणाऱ्या मृत्यूमुळे बार मालकाने ही खुर्ची गोडाऊनमध्ये ठेवून दिली. मात्र, इथेही या खुर्चीने लोकांचा जीव घेतला.

शापित खुर्ची थर्स्कच्या संग्रहालयात

एकदा गोदामात सामान ठेवायला आलेला कामगार खूप थकला होता आणि तो आराम करायसाठी त्या खुर्चीत जाऊन बसला. त्यानंतर तासाभराने त्या कामगाराचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर बारच्या मालकाने ही खुर्ची थर्स्कच्या संग्रहालयाला दान केली. तेव्हापासून ही खुर्ची त्या संग्रहालयात ५ फूट उंचीवर ठेवण्यात आली होती. जेणेकरून चुकूनही कोणी या खुर्चीवर बसू नये.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *