परभणी : मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी परभणीमध्ये मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. आरक्षणासाठी विविध मार्गाने आंदोलने केली जात आहेत. तर जवळपास परभणीतील सर्वच गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे. शातच परभणीच्या गंगाखेड येथे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या पदाधिकाऱ्यांकडून विकास कामाचे भूमिपूजन केले जात होते. याची माहिती मराठा समाज बांधवांना मिळाल्यानंतर त्यांनी भूमिपूजन होत असलेल्या ठिकाणी जात भूमिपूजनाचा कार्यक्रम उधळला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत एकाही राजकीय नेत्यांनी उद्घाटन करू नये अशी भूमिका मराठा समाज बांधवांनी घेतली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राजकीय नेत्यांची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद मुरकुटे , राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी जिल्हा परिषद सदस्य किशनराव भोसले हे गंगाखेड शहरात विकास कामाचे भूमिपूजन करण्यासाठी गेले होते. याची माहिती मराठा आरक्षण समन्वय समितीला मिळाल्यानंतर मराठा समाज बांधवांनी थेट उद्घाटन स्थळी धाव घेतली आणि उद्घाटनाचा कार्यक्रम उधळून लावला. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत एकाही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी उद्घाटन करू नये अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. राजकीय नेत्यांच्या हस्ते उद्घाटन केले जात असल्यामुळे मराठा समाज बांधव चांगलेच आक्रमक झाल्यामुळे उद्घाटन करत असलेल्या व्यक्तींना काढता पाय घेण्याची वेळ आली. मराठा समाज बांधवांनी उद्घाटनाचा कार्यक्रम उधळून लावल्यामुळे आता इतर राजकीय नेत्यांना देखील आपण उद्घाटन करावे की नाही असा प्रश्न पडलेला आहे. मराठा समाज बांधव आक्रमक झाले असल्याने राजकीय नेत्यांची चांगलीच कोंडी होणार आहे.

पुण्यातील भाजपच्या माजी नगरसेवकाला ५ कोटींच्या फसवणूक प्रकरणात दिलासा, उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर
आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत उद्घाटन करणार नाही

मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आपण कुठल्याही कामाचे उद्घाटन करणार नाही अशी भूमिका आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी घेतली आहे. विकास कामांना अडथळा येऊ नये यासाठी समाजातील प्रतिष्ठित नागरिक, साधुसंत यांच्या हस्ते उद्घाटन करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

गावबंदी असताना तुम्ही इथे कसे?, मराठा बांधवानी शहाजी पाटलांना विचारला जाब, आंदोलकांची घोषणाबाजी!

Read Latest Maharashtra News And Marathi NewsSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *