खेट्री येथे ग्रामसभेत विहिरींसाठी ९६ प्रस्ताव प्राप्त:बीडीओंच्या आदेशानुसार विशेष ग्रामसभेचे आयोजन; सचिवांनी केले वाचन

खेट्री येथे ग्रामसभेत विहिरींसाठी ९६ प्रस्ताव प्राप्त:बीडीओंच्या आदेशानुसार विशेष ग्रामसभेचे आयोजन; सचिवांनी केले वाचन

पातूर पंचायत समिती अंतर्गत खेट्री येथे रविवारी गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. ‘मागेल त्याला विहीर’ या शासनाच्या धोरणात्मक नुसार ग्रामपंचायतीमार्फत शेतकऱ्याकडून विहिरींचे प्रस्ताव पंचायत समितीमध्ये सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. खेट्री येथे सुद्धा शेतकऱ्याकडून विहिरीचे प्रस्ताव घेण्यासाठी रविवारी २ ग्रामपंचायत सदस्य शेख साजीद शेख कबीर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या सभेमध्ये ९६ शेतकऱ्यांचे विहिरीचे प्रस्ताव प्राप्त झाले. सचिव बी. बी. आडे यांनी आलेल्या प्रस्तावाचे नावाचे वाचन केले. यावेळी चान्नी ठाण्याचे ठाणेदार रवींद्र लांडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सदानंद व्यवहारे, संदीप उबाळे, शेख अख्तर, योगेश शेळके, शंकर चव्हाण, मो. मुदस्सीर, विनोद वांडे आदी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. पैसे देण्याच्या आमिषाला बळी पडू नका मागेल त्याला विहीर अशी शासनाची संकल्पना सुरू आहे. मात्र, विहिरीची मंजुरात साठी पातूर तालुक्यात अनेक गावात दलालांमार्फत हजारो रुपयांची वसुली करण्यात आल्याचा आरोप होत आहे. परंतु पैसे देण्याच्या आमिषाला बळी पडू नका,असे आवाहन गटविकास अधिकाऱ्याकडून केले जात आहे. प्रस्ताव मंजुरीसाठी सादर गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार रविवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जवळपास १०० विहिरीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहे. त्याबाबत सभेमध्ये नावाचे वाचन केले असून, हे प्रस्ताव मंजुरीसाठी गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येईल. – बी. बी. आडे, सचिव ग्रामपंचायत, खेट्री

​पातूर पंचायत समिती अंतर्गत खेट्री येथे रविवारी गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. ‘मागेल त्याला विहीर’ या शासनाच्या धोरणात्मक नुसार ग्रामपंचायतीमार्फत शेतकऱ्याकडून विहिरींचे प्रस्ताव पंचायत समितीमध्ये सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. खेट्री येथे सुद्धा शेतकऱ्याकडून विहिरीचे प्रस्ताव घेण्यासाठी रविवारी २ ग्रामपंचायत सदस्य शेख साजीद शेख कबीर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या सभेमध्ये ९६ शेतकऱ्यांचे विहिरीचे प्रस्ताव प्राप्त झाले. सचिव बी. बी. आडे यांनी आलेल्या प्रस्तावाचे नावाचे वाचन केले. यावेळी चान्नी ठाण्याचे ठाणेदार रवींद्र लांडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सदानंद व्यवहारे, संदीप उबाळे, शेख अख्तर, योगेश शेळके, शंकर चव्हाण, मो. मुदस्सीर, विनोद वांडे आदी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. पैसे देण्याच्या आमिषाला बळी पडू नका मागेल त्याला विहीर अशी शासनाची संकल्पना सुरू आहे. मात्र, विहिरीची मंजुरात साठी पातूर तालुक्यात अनेक गावात दलालांमार्फत हजारो रुपयांची वसुली करण्यात आल्याचा आरोप होत आहे. परंतु पैसे देण्याच्या आमिषाला बळी पडू नका,असे आवाहन गटविकास अधिकाऱ्याकडून केले जात आहे. प्रस्ताव मंजुरीसाठी सादर गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार रविवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जवळपास १०० विहिरीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहे. त्याबाबत सभेमध्ये नावाचे वाचन केले असून, हे प्रस्ताव मंजुरीसाठी गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येईल. – बी. बी. आडे, सचिव ग्रामपंचायत, खेट्री  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment