गुणरत्न सदावर्तेंच्या पॅनलची सभा उधळली:एसटी कामगार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांचा गोंधळ, एकमेकांवर खुर्च्या फेकत राडा

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलकडून भंडारा येथे बोलावण्यात आलेली एसटी ट्रान्सपोर्ट बॅंकेची सभा उधळून लावण्यात आली आहे. एसटी कामगार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ही सभा उधळून लावली आहे. सभेत खुर्च्या तोडण्यात आल्या तसेच पोलिसांवरही खुर्च्या फेकण्यात आल्या, धक्काबुक्की झाली. तसेच अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. तसेच सदावर्ते यांच्या समर्थकांनी भंडारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या एसटी ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेची ही 71 वी सभा गुणरत्न सदावर्ते यांनी भंडाऱ्यात आयोजित केली होती. मात्र एसटी कामगार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ही सभा उधळून लावली. यावेळी विरोधकांनी वार्षिक विशेषांकावर सत्ताधाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्री राम यांच्यासह नथुराम गोडसे यांचाही फोटो लावल्याचा मुद्दा पुढे करत तसेच आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. यावेळी सदावर्ते समर्थक आणि विरोधकांमधील वाद एवढा विकोपाला गेला की सभेतील खुर्च्या तसेच अहवालाची पुस्तके देखील फाडून फेकली. एकमेकांवर फेकल्या खुर्च्या
विरोधक आणि सदावर्ते समर्थकांमध्ये वाद वाढल्यावर एकमेकांना धक्काबुक्की करत खुर्च्यांची तोडफोड करत एकमेकांवर फेकली. यातील काही खुर्च्या पोलिसांनाही फेकून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एसटी कामगार कृती समितीनं सभेतून बाहेर पडत लगतच्या दुसऱ्या सभागृहात वार्षिक सभा आटोपली. तर, सत्ताधाऱ्यांनी ही सभा तहकूब केल्याची घोषणा केली. या घटनेनंतर गुणरत्न सदावर्ते यांच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी विरोधकांवर भंडारा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी गुणरत्न सदावर्ते यांनी 35 लाखांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करत फौजदारी तक्रार दाखल करण्याचा ठराव पारित केला आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी 35 लाख लुटले
एसटी कामगार कृती संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले, जिथे सदावर्ते पती पत्नी आहेत, तिथे निश्चितपणे राडा आलाच. सदावर्ते यांनी सदावर्ते यांनी एसटीच्या बाहेरचे सभासद बनविण्याचा कुटील डाव रचला आहे. एसटीच्या बाहेरील सभासद बनविल्यास बँक बुडण्याचा धोका आहे. आज भंडाऱ्यात पार पडलेली सभा ही कुठल्याही नियमानुसार, कायद्यानुसार झालेली नाही. सदावर्ते हे स्वतः वकील असून त्यांनी 35 लाख लुटले आहेत, असा आरोप संदीप शिंदे यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले, सदावर्ते यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत पारित करण्यात आला आहे. 34 कोटींचे डेटा सेंटर आणले त्यात मोठा अपहार करण्यात आलेला आहे. सर्वसाधारण सभासदांना सभेत बोलण्याची संधी दिली नाही, तेव्हा ही सभा उधळून लावली. सदावर्तेंमध्ये दम असेल तर समोरासमोर यावं. हॉटेलमध्ये झोपा काढून बाउन्सर एसटीच्या सभासदांवर पाठवून भ्याडपणा करू नये, असा इशारा त्यांनी दिला. बँकेला बदनाम करण्याचा कॉंग्रेसचा डाव
सदावर्ते गटाचे नितीन शिंदे म्हणाले की, गेल्या 30 वर्षांपासून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात असलेली ही बँक सदावर्ते यांनी हिसकावली. सोन्याची अंडी देणारी बँक अशी कॉंग्रेसवाल्यांची धारणा होती. त्यामुळेच या सभेत त्यांनी राडा केला आहे. या बँकेच्या संचालक मंडळामध्ये सर्वसामान्य कर्मचारी ज्यामध्ये चालक, वाहक, तांत्रिक यांना निवडून आणण्यात सदावर्ते यांची महत्त्वाची भूमिका होती. मागील 30-40 वर्षांमध्ये ते करू शकले नाहीत, अशी काँग्रेस – राष्ट्रवादीची धारणा झाली आणि त्यामुळेच बँकेला हा बदनाम करण्याचा प्रकार आहे.

​अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलकडून भंडारा येथे बोलावण्यात आलेली एसटी ट्रान्सपोर्ट बॅंकेची सभा उधळून लावण्यात आली आहे. एसटी कामगार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ही सभा उधळून लावली आहे. सभेत खुर्च्या तोडण्यात आल्या तसेच पोलिसांवरही खुर्च्या फेकण्यात आल्या, धक्काबुक्की झाली. तसेच अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. तसेच सदावर्ते यांच्या समर्थकांनी भंडारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या एसटी ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेची ही 71 वी सभा गुणरत्न सदावर्ते यांनी भंडाऱ्यात आयोजित केली होती. मात्र एसटी कामगार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ही सभा उधळून लावली. यावेळी विरोधकांनी वार्षिक विशेषांकावर सत्ताधाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्री राम यांच्यासह नथुराम गोडसे यांचाही फोटो लावल्याचा मुद्दा पुढे करत तसेच आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. यावेळी सदावर्ते समर्थक आणि विरोधकांमधील वाद एवढा विकोपाला गेला की सभेतील खुर्च्या तसेच अहवालाची पुस्तके देखील फाडून फेकली. एकमेकांवर फेकल्या खुर्च्या
विरोधक आणि सदावर्ते समर्थकांमध्ये वाद वाढल्यावर एकमेकांना धक्काबुक्की करत खुर्च्यांची तोडफोड करत एकमेकांवर फेकली. यातील काही खुर्च्या पोलिसांनाही फेकून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एसटी कामगार कृती समितीनं सभेतून बाहेर पडत लगतच्या दुसऱ्या सभागृहात वार्षिक सभा आटोपली. तर, सत्ताधाऱ्यांनी ही सभा तहकूब केल्याची घोषणा केली. या घटनेनंतर गुणरत्न सदावर्ते यांच्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी विरोधकांवर भंडारा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी गुणरत्न सदावर्ते यांनी 35 लाखांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करत फौजदारी तक्रार दाखल करण्याचा ठराव पारित केला आहे. गुणरत्न सदावर्ते यांनी 35 लाख लुटले
एसटी कामगार कृती संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले, जिथे सदावर्ते पती पत्नी आहेत, तिथे निश्चितपणे राडा आलाच. सदावर्ते यांनी सदावर्ते यांनी एसटीच्या बाहेरचे सभासद बनविण्याचा कुटील डाव रचला आहे. एसटीच्या बाहेरील सभासद बनविल्यास बँक बुडण्याचा धोका आहे. आज भंडाऱ्यात पार पडलेली सभा ही कुठल्याही नियमानुसार, कायद्यानुसार झालेली नाही. सदावर्ते हे स्वतः वकील असून त्यांनी 35 लाख लुटले आहेत, असा आरोप संदीप शिंदे यांनी केला आहे. पुढे ते म्हणाले, सदावर्ते यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेत पारित करण्यात आला आहे. 34 कोटींचे डेटा सेंटर आणले त्यात मोठा अपहार करण्यात आलेला आहे. सर्वसाधारण सभासदांना सभेत बोलण्याची संधी दिली नाही, तेव्हा ही सभा उधळून लावली. सदावर्तेंमध्ये दम असेल तर समोरासमोर यावं. हॉटेलमध्ये झोपा काढून बाउन्सर एसटीच्या सभासदांवर पाठवून भ्याडपणा करू नये, असा इशारा त्यांनी दिला. बँकेला बदनाम करण्याचा कॉंग्रेसचा डाव
सदावर्ते गटाचे नितीन शिंदे म्हणाले की, गेल्या 30 वर्षांपासून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यात असलेली ही बँक सदावर्ते यांनी हिसकावली. सोन्याची अंडी देणारी बँक अशी कॉंग्रेसवाल्यांची धारणा होती. त्यामुळेच या सभेत त्यांनी राडा केला आहे. या बँकेच्या संचालक मंडळामध्ये सर्वसामान्य कर्मचारी ज्यामध्ये चालक, वाहक, तांत्रिक यांना निवडून आणण्यात सदावर्ते यांची महत्त्वाची भूमिका होती. मागील 30-40 वर्षांमध्ये ते करू शकले नाहीत, अशी काँग्रेस – राष्ट्रवादीची धारणा झाली आणि त्यामुळेच बँकेला हा बदनाम करण्याचा प्रकार आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment