पश्चिम बंगालमध्ये एक धक्कादायक आणि चक्रावून टाकणारी घटना घडली आहे. एका व्यक्तीच्या पोटात डिओची बाटली अडकली. ही बाटली ७.५ इंच लांबीची होती. ही बाटली जवळपास ३ आठवडे २७ वर्षीय तरुणाच्या पोटात अडकली होती.

 

bengal deo
कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये एक धक्कादायक आणि चक्रावून टाकणारी घटना घडली आहे. एका व्यक्तीच्या पोटात डिओची बाटली अडकली. ही बाटली ७.५ इंच लांबीची होती. ही बाटली जवळपास ३ आठवडे २७ वर्षीय तरुणाच्या पोटात अडकली होती. डॉक्टरांनी जवळपास २ तास शस्त्रक्रिया करून बाटली बाहेर काढली.

पश्चिम बंगालमधील २७ वर्षीय तरुणाच्या पोटात दुखू लागलं. त्यामुळे तो उपचारांसाठी बर्दवान वैद्यकीय रुग्णालयात दाखल झाला. त्याच्या पोटात डिओची बाटली असल्याचं कुटुंबियांनी सांगितलं. त्यामुळे डॉक्टर चकित झाले. डॉक्टरांनी एक्स रे काढला. तेव्हा तरुणाच्या पोटात एक बाटली दिसून आली. यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ही शस्त्रक्रिया २ तास चालली. तरुणाच्या पोटातून ७.५ इंचाची बाटली बाहेर काढण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून तरुणाची प्रकृती उत्तम असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. सात दिवस त्याला रुग्णालयात ठेवण्यात येईल. त्यानंतर प्रकृती पाहून डिस्चार्ज देण्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल.
अभ्यास कर! पैसे वाया घालवू नको! स्पर्धा परीक्षेत नापास झाल्यानं लहान भावाला मारहाण; मृत्यू
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, २० दिवसांपूर्वी तरुणाच्या गुप्तांगातून डिओची बाटली पोटापर्यंत पोहोचली. तेव्हापासून तरुणाला शौच करताना त्रास होऊ लागला. दिवसागणिक त्याची प्रकृती बिघडू लागली. ही बाटली तरुणाच्या पोटापर्यंत कशी पोहोचली, असा प्रश्न डॉक्टरांना पडला आहे. रुग्णालय प्रशासन यासंदर्भात चौकशी करत आहे.
वसई बीचवर सापडलेली सूटकेस; थरकाप उडवणारी मर्डर मिस्ट्री, १३ महिन्यांनी गूढ उकललं
जवळपास तीन आठवडे डिओची बाटली तरुणाच्या पोटात होती. त्यामुळे तरुणाच्या अंतर्गत अवयवांना इजा झाली. तरुणाच्या दोन्ही अन्ननलिका आणि आतड्यांना यामुळे दुखापत झाली. त्यांना झालेली दुखापत पाहता भविष्यात त्यावरही शस्त्रक्रियेची गरज भासू शकते. रुग्णालयातील डॉक्टरांनी योग्यरित्या शस्त्रक्रिया केल्याबद्दल तरुणाच्या कुटुंबानं समाधान व्यक्त केलं.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.