मुख्यमंत्री शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेले 5 आमदार पराभूत:शहाजीबापू, सरवणकर यांच्यासह तिघांना बसला दणका

मुख्यमंत्री शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेले 5 आमदार पराभूत:शहाजीबापू, सरवणकर यांच्यासह तिघांना बसला दणका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना शिंदे पक्षाचे गुवाहाटीला गेलेले पाच आमदार पराभूत झाले आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेले सर्व निवडून आणले नाही, तर राजकारणातून निवृत्ती घेऊ असे म्हणले होते. पराभूत आमदारांमध्ये सदा सरवणकर, यामिनी जाधव, शहाजीबापू पाटील, संजय रायमूलकर आणि ज्ञानराच चौगुले यांचा समावेश आहे. माहीममध्ये सदा सरवणकर यांचा तिरंगी लढतीत पराभव झाला. शहाजीबापू पाटील यांना सांगोल्यात शेतकरी कामगार पक्षाकडून पराभव स्वीकारावा लागला. भायखळ्यातून यामिनी जाधव पराभूत झाल्या. बुलढाण्यातून संजय रायमूलकर यांचा पराभव झाला. उमरग्यामध्ये ज्ञानराज चौगुले यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आव्हान खोटे ठरले असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून 2022 मध्ये शिवसेनेत बंडखोरी केली होती. ते शिवसेना आणि अपक्ष असे 50 आमदार सोबत घेऊन बाहेर पडले होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंचे सरकार पडले होते. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. उद्धव ठाकरे यांच्याकडील धनुष्यबाण हे चिन्हही निवडणूक आयोगाने त्यांना दिले होते. विधानसभा निवडणुकीत बंडखोरांमधील एकही आमदार निवडून येणार नाही, असा दावा शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जात होता. पण हा दावा आता फोल होताना दिसत आहे. नेमके काय म्हणाले होते एकनाथ शिंदे?
त्यावेळी झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपले पहिले भाषण केले होते. आमचा 50 मधला एकही आमदार आम्ही पडू देणार नाही. तसेच भाजपचेही 115 आमदार मिळून आम्ही 200 चा आकडा पार करू. हा सभागृहात शब्द आहे आणि तसे नाही केले, तर गावाला शेती करायला जाईन, असे एकनाथ शिंदे म्हणाले होते. आता शिंदेंच्या शिवसेनेने 55 जागांवर आघाडी घेत आपला स्ट्राईक रेट वाढविला आहे. तसेच महायुतीचा आकडा 220 पेक्षा अधिक होताना दिसत आहे.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment