अहमदाबाद: एखाद्या सामन्याचा रोख बदलण्यासाठी आणि खेळाडूला मैदानात सेट होण्यासाठी एखादे षटक खूप महत्त्वाचे ठरते. असेच गुजरातच्या डावातील १२ वे षटक होते, या षटकात शुभमन गिलची शानदार फटकेबाजी पाहायला मिळाली. खरे तर या षटकात शुभमन गिलला समजले की हा दिवस त्याचा आहे. आणि त्याने स्वतःला एक मोठी खेळी खेळण्याचे वचन दिले. पण या षटकात असं नेमकं घडलं तरी काय, पाहूया सविस्तरपण शुभमन गिल मैदानात असताना त्याच्या डोक्यात काय सुरु होतं आणि त्याने या षटकानंतर त्याची खेळण्याची पद्धत अधिक आक्रमक अक्षी केली, हे त्याने स्वतःच सामन्यानंतर सांगितलं. गुजरातने मुंबई इंडियन्सवर विजय मिळवल्यानंतर आणि अंतिम फेरीचे तिकीट मिळाल्यानंतर शुभमन गिल म्हणाला, “मला बॉल टू बॉल, ओव्हर टू ओव्हर खेळायला आवडते. ज्या षटकात मी तीन षटकार मारले त्या षटकानंतर मला समजले की हा माझा दिवस आहे. त्या ३ षटकारांमुळे मला ती मोठी खेळी खेळण्याची गती मिळाली.”
मधवालचे षटक
गिलने १२९ धावांच्या खेळीत १० षटकार ठोकले. पण तो येथे ज्या ३ षटकारांबद्दल बोलत आहे ते १२ व्या षटकातील षटकार होते. हे षटक मुंबई इंडियन्सच्या आकाश मधवालचे होते, ज्याच्याविरुद्ध शुभमन गिलने पहिल्या, दुसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर षटकार ठोकला. शुभमन गिलच्या म्हणण्यानुसार, या तीन षटकारांनी त्याला मोठी खेळी खेळण्याचा आत्मविश्वास दिला.

त्या ३ षटकारांमधून मिळालेल्या आत्मविश्वासाचा फायदा घेत शुभमन गिलने शतक झळकावले. त्याने ६० चेंडूत १२९ धावांची खेळी केली, जी आयपीएल प्लेऑफमधील कोणत्याही फलंदाजाची सर्वात मोठी खेळी आहे. ७ चौकार, १० षटकार आणि २१५ च्या स्ट्राईक रेटने सजलेल्या या खेळीमुळे गुजरात टायटन्सने २० षटकांत २३३ धावांची मोठी धावसंख्या उभारली. मुंबई इंडियन्ससमोर २३४ धावांचे लक्ष्य होते. पण, त्याचा पाठलाग करताना मुंबईचा संघ १७१ धावाच करू शकला. अशाप्रकारे अंतिम तिकीट त्यांच्यापासून ६२ धावा दूर राहिले.