मुंबई: एका वृद्ध महिलेला स्वयंपाकघर साफ करत असताना एक पेंटिंग दिसली. त्यांना वाटलं की ती काही कामाची नाही, कचरा आहे. पण, नंतर लक्षात आले की ही काही सामान्य पेंटिंग नाही. तर, त्या पेंटिंगची किंमत २५ दशलक्ष डॉलर्स (सुमारे २०८ कोटी रुपये) पेक्षा जास्त आहे. क्राइस्ट मॉक्ड असे या पेंटिंगचे नाव आहे. हे इटालियन चित्रकार सिमाब्यू यांनी तयार केले आहे. हे १३व्या शतकातील चित्र आहे. फ्रान्स सरकारने याला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केले आहे. आता ही पेंटिंग फ्रान्सच्या प्रसिद्ध लूवर म्युझियममध्ये ठेवण्यात येणार आहे.

टाईम्सच्या रिपोर्टनुसार, २०१९ मध्ये साफसफाई करताना हे पेंटिंग सापडले होते. २५ दशलक्ष डॉलर्समध्ये त्याचा लिलाव करण्यात आला. या महिलेचे वय ९० पेक्षा जास्त आहे. तिच्या घरात असलेल्या या पेंटिंगची खरी किंमत तिला माहीत नव्हती. वृद्ध महिलेला वाटले की ही रशियाशी संबंधित काही निरुपयोगी गोष्ट आहे आणि ती हे पेंटिंग कचराकुंडीत फेकणार होती.

८ महिन्यांच्या आजारी बाळाला कुशीत घेत शिक्षिका निवडणूक ड्युटीवर, जिल्हाधिकारी म्हणाले…
हे चित्र चिलीचे अब्जाधीश अल्वारो सायह बेंडेक आणि त्यांची अर्थतज्ञ पत्नी एना गुझमन अह्नफेल्ट यांनी त्यांच्या वैयक्तिक संग्रहासाठी खरेदी केले होते. जेव्हा फ्रेंच सरकारने पेंटिंगला निर्यात परवाना देण्यास नकार दिला तेव्हा अडचणी निर्माण झाल्या. पेंटिंग आपल्याकडे ठेवण्यासाठी आवश्यक निधी गोळा करण्यासाठी संग्रहालयाला ३० महिन्यांची मुदत देण्यात आली होती. या पेंटिंगसाठी संग्रहालयाने किती रक्कम भरली याचा खुलासा करण्यात आलेला नाही.

चित्रकार सिमाब्यूचे आणखी एक पेंटिंग Maesta हे आधीच संग्रहालयात ठेवले आहे. सध्या त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. हे आणि २०८ कोटी रुपयांना लिलाव होणारे क्राइस्ट मॉक्ड हे पेंटिंग २०२५ च्या वसंत ऋतूमध्ये आयोजित प्रदर्शनात सादर केले जाणार आहे.
जुन्या भांडणाचा राग, मित्रावर वार; डोक्यात दगड घालून संपवलं, नाशकात हत्येची हादरवणारी घटना
Read Latest Maharashtra News And Marathi News



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *