अच्छे दिन का किए थे वादा, उनका दिन खराब आएगा:अंबादास दानवे यांचा भाजपला इशारा; विजयाचा व्यक्त केला विश्वास
‘हर सितम का जवाब आएगा, देखना इंकलाब आएगा’ असे म्हणत उद्धव ठाकरे गटाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल आज दुपारपर्यंत हाती येईल. मात्र, त्या आधीच अंबादास दानवे यांनी भारतीय जनता पक्षाला इशारा दिला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना पाहायला मिळाला. यामध्ये भारतीय जनता पक्षावर उद्धव ठाकरे गटाच्या वतीने अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्यातच अंबादास दानवे यांनी भाजपने दिलेल्या ‘अच्छे दिन’चा घोषणेची आठवण करून दिली आहे. ‘अच्छे दिन का जो किए थे वादा’ असे म्हणतात दानवे यांनी भारतीय जनता पक्षाला इशारा दिला आहे. अंबादास दानवे यांनी केलेली पोस्ट देखील पहा हर सितम का जवाब आएगा,
देखना इंकलाब आएगा,
अच्छे दिन का जो किए थे वादा,
उनका दिन भी खराब आएगा.. दुपारपर्यंत निकाल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे. आज दुपारपर्यंत विधानसभेचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यातील मतदार हे महाविकास आघाडीला कौल देणार की, महायुतीला देणार, हे आता काही तासातच स्पष्ट होईल. मात्र त्या आधीच विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करत भाजपला इशारा दिला आहे. संभाजीनगरकडे सर्वांचेच लक्ष छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अंबादास दानवे हे जिल्हाध्यक्ष असतानाच शिवसेनेच्या एक सोडून सर्व आमदारांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली होती. केवळ कन्नडचे एकमेव आमदार हे ठाकरे यांच्या सोबत राहिले होते. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या सर्व उमेदवारांसाठी दानवे यांनी कसून प्रचार केला. मात्र, आता त्यांच्या या प्रयत्नांना किती यश मिळेल? हे निकालानंतर स्पष्ट होईल.