परभणी: लग्नाचे अमिष दाखवून एका २६ वर्षीय युवतीवर ३ वर्ष अत्याचार करण्यात आला. तसेच आरोपी त्यादरम्यान दुसऱ्या मुलीसोबतही संबंध ठेवून होता. आरोपीने त्या दुसऱ्या मुलीसोबत लग्न देखील केले. त्यामुळे पिडीतेचा विश्वासघात झाला. ही घटना सन २०२१ ते जानेवारी २०२४ पाथरी, मानवत या ठिकाणी घडली आहे. याप्रकरणी पिडीतेच्या तक्रारीवरुन आरोपी विरोधात पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ghosalkar Murder: बोरिवलीत अंत्यसंस्कारास विरोध, मॉरिसला दफन करण्यासाठी शोधावे लागले हे ठिकाण
मिळालेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय पिडीतेने दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे की, आरोपी दत्ता सुरेश इंगळे याने पिडीतेला लग्नाचे अमिष दाखवून वारंवार अत्याचार केला. आरोपी दत्ता इंगळेने पीडितेला लग्न करण्याचे आमिष दाखवले. तिच्यासोबत एकनिष्ठ असल्याची भावना देखील व्यक्त केली. वेळोवेळी शारीरिक संबंधही ठेवले. त्यामुळे पिडीता ही गरोदर राहिली आरोपी पासून तिला एक मुलगा झाला.

फारुकी फर्मान पाहिलं, राज ठाकरे म्हणाले हे तर अजित पवार बोलतात तसं लिहिलंय, ना स्वल्पविराम ना उद्गारवाचक चिन्ह !

यानंतर आरोपीने दत्ता इंगळे यांनी पिडीतेला काही ही न सांगता दुसऱ्या मुलीसोबत लग्न केले. त्या दुसऱ्या मुलीशी संसारही सुरू केला पण पीडित युवतीला हा सर्व प्रकार कळला तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर पीडितेने पाथरी पोलीस ठाणे गाठत दत्ता इंगळे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास सपोनि रविंद्र पोलीसात सांगळे करत आहेत. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपीस १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

म. टा. प्रतिनिधी यांच्याविषयीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *