मुंबई : अभिनेता संतोष जुवेकर नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. अनेकदा तो आपलं मनातलं सांगण्यासाठी या माध्यमाचा उपयोग करून घेतो. आताही संतोषनं एक पोस्ट त्याच्या व्हिडिसकट शेअर केली आहे. त्यात त्यानं एकदम मार्मिक लिहिलं आहे.

संतोषनं डोळ्यांचा क्लोजअप अॅक्शनसहित पोस्ट करत लिहिलं आहे, ‘ नजरेला नजर लागू नये म्हणून हा नजरेला लावलेला काला टिक्का! ते म्हणतात कितीही काम केलं तरी हे असे व्हिडिओ बनवा. कारण आज काल म्हणे रियसमध्ये नाही दिसलात तरी चालेल पण रीलमध्ये दिसणं महत्त्वाचं! काय बोलायचं आता सांगा?अहो सांगा खरंच, करा कमेंट्स आणि हाना नाहीतर आपलं म्हना.’ यावर अनेकांनी हार्ट इमोजी टाकल्यात. अनेकांनी कौतुकही केलंय.

कसं शक्य आहे! नोरा फतेहीचा तीळ व्हिडिओत दिसतो पण फोटोत नाही

हल्ली जवळ जवळ सगळेच कलाकार सोशल मीडियावर रील्स पोस्ट करत असतात. त्यामुळे त्यांचा चाहता वर्गही वाढतोच. पण फॅन्स आणि कलाकार यांच्यात थेट कनेक्शन राहतं. कारण चाहत्यांची मतं सोशल मीडियामुळे लगेचंच कळतात. त्यामुे सोशल मीडिया सगळ्यांसाठीच व्यक्त होण्याचं माध्यम झालं आहे.

संतोष जुवेकर हा काॅफी प्रेमी आहे. त्याला काॅफी खूप आवडते. म्हणूनच त्यानं पावसाळ्यात लिहिलं होतं, ‘रिप रिप पावसात आज अचानक तिची आठवण आली आणि हिला ओठांशी धरून मी तिला रिप (RIP) केलं.’ पावसाळ्यात रात्री तो काॅफी पितोय. त्याच्या पोस्टवरून ते कळतंय. भर पावसात कोणाला चहा, कोणाला भजी आवडतात. पण संतोषला गरमागरम काॅफी प्यायला आवडते.

अनिरुद्धला आला आध्यात्मिक अनुभव, याचा संबंध आहे एका बासरीशी!

आलिया भट्ट, विजय वर्मा, शेफाली शाह आणि रोशन मॅथ्यूज यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या ‘डार्लिंग्ज’ सिनेमात संतोष जुवेकर एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. एक मराठमोळा चेहरा या सिनेमात दिसत असल्याने संतोष जुवेकरचे सोशल मीडियावर विशेष कौतुक होत आहे.

‘रंगीला गर्ल’चा मराठी सिनेसृष्टीत कमबॅक, लवकरच झळकणार मराठी चित्रपटातSource link

Leave a Reply

Your email address will not be published.