दरवर्षी जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे (father’s day 2022) जगभरात साजरा केला जातो. यावेळी हा खास दिवस 19 जून रोजी साजरा केला जाणार आहे. बरं, वडिलांच्या प्रेमाबद्दल आणि त्यागाबद्दल आभार मानण्यासाठी एक दिवस पुरेसा असू शकत नाही. पण या एका दिवशी तुम्ही तुमच्या वडिलांसाठी संपूर्ण वर्ष चांगले जाण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय नक्कीच घेऊ शकता. त्यापैकी एक म्हणजे तुमच्या वडिलांच्या तब्येतीची काळजी घेणे. या फादर्स डे वेळी, तुमचे वडील फिट राहण्यासाठी तज्ञांच्या सूचनांचे नियमितपणे पालन करत आहेत की नाही याची खात्री करा.

जर तुम्ही स्वतः वडील असाल तर तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या निरोगी आणि आनंदी भविष्यासाठी या सवयींकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. वेल्थ बिफॉर हेल्थच्या संस्थापक न्यूट्रिशनिस्ट सपना जयसिंह पटेल यांचे म्हणणे आहे की, निरोगी जीवनशैली जगणे हे तुमचे एकंदर आरोग्य सुधारण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्यदायी सवयी अंगीकारल्या पाहिजेत. त्याचवेळी, काही सवयी अशा आहेत ज्या विशेषतः वडिलांनी त्यांच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे.

हेल्दी आहार घ्या

दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी संतुलित आहार घेणे ही एक महत्त्वाची सवय आहे. यामध्ये भरपूर फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि लीन प्रथिने खा. तसेच मीठ आणि साखर यांसारखे प्रक्रिया केलेले आणि अनहेल्दी पदार्थांचे सेवन मर्यादित प्रमाणातच करा. घरी शिजवलेले अन्न अधिकाधिक खाण्याचा प्रयत्न करा. योग्य अन्नपदार्थ खाल्ल्याने वजन निरोगी राखण्यात तर मदत होईलच सोबतच हृदयविकार, हार्ट स्ट्रोक आणि मधुमेह यांसारखे जुनाट आजार होण्याचा धोकाही कमी होण्यास मदत होईल.

(वाचा :- Sonia Gandhi health Nosebleed : चिंताजनक, करोनानंतर सोनिया गांधींच्या नाकातून वाहू लागलं रक्त, नोज ब्लीड हे सुद्धा आहे का कोविडचं गंभीर लक्षणं?)

नियमित व्यायाम करा

तुमच्या आरोग्यासाठी तुम्ही काही खास करू शकत असाल तर अशा सर्वात महत्वाच्या गोष्टींपैकी एक व्यायाम आहे. हे तुमचे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. तुमची हाडे आणि स्नायू मजबूत करते, तुमची मनःस्थिती आणि ऊर्जेची पातळी सुधारते आणि हृदयविकार, मधुमेह आणि कर्करोग यांसारखे जुनाट आजार होण्याचा धोका देखील कमी करते. म्हणून, आठवड्याच्या बहुतेक दिवसांमध्ये, किमान 30 मिनिटे मध्यम-तीव्रतेचे व्यायाम नक्की करा. चालणे, जॉगिंग, पूलमध्ये पोहणे आणि टेनिस किंवा बास्केटबॉल खेळणे हे तुमचे हृदय तेज करण्यासाठीचे आणि तुमचे शरीर अॅक्टिव्ह ठेवण्याचे उत्तम मार्ग आहेत.

(वाचा :- COVID 4th wave symptoms : करोनाने पुन्हा केले भंयकर रूप धारण, एकसाथ 13000 लोक विळख्यात, चौथ्या लाटेत दिसतायत ‘ही’ 6 गंभीर लक्षणं..!)

झोप आहे आरोग्यासाठी महत्त्वाची

संपूर्ण आरोग्य आणि निरोगी राहण्यासाठी झोप आवश्यक आहे. दररोज सात ते आठ तासांची झोप घेतल्याने तुम्हाला फ्रेश व हेल्दी वाटू शकते, तुमची ऊर्जेची पातळी वाढू शकते आणि दीर्घकालीन आरोग्य समस्या निर्माण होण्याची शक्यता कमी होते. हे तुम्हाला चांगले निर्णय घेण्यास, अधिक लक्ष केंद्रित ठेवण्यास आणि कमी आवेगपूर्ण राहण्यास देखील मदत करू शकते.

(वाचा :- Baldness treatment : तरूणपणात का पडू लागलंय मुला-मुलींचं टक्कल? औषधं न घेता हवे असतील लांबसडक, घनदाट व काळेभोर केस, तर करा Cosmetic Surgeon चे ‘हे’ उपाय…!)

संपूर्ण बॉडीचं नियमित चेकअप करणे

वाढत्या वयानुसार आरोग्य निरोगी राखण्यासाठी डॉक्टरांचा नियमित सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांकडून तपासणी करून हृदयविकार आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांचे प्राथमिक अवस्थेतच निदान करण्यात यश मिळू शकते.

(वाचा :- Omicron COVID 4th Wave in India : बापरे, करोनाची चौथी लाट आली? 7 दिवसांत 55235 लोक आजारी, ‘या’ 6 लक्षणांवर ठेवा बारीक लक्ष..!)

दारू व सिगारेटचे सेवन करू नका

जास्त मद्यपान तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जर तुम्ही धूम्रपान करत असाल तर ते वेळीच सोडणे हा सर्वात आरोग्यदायी निर्णय असू शकतो. धूम्रपान हे मृत्यू आणि गंभीर आजारांचे प्रमुख कारण आहे. ज्यामुळे हृदयविकार, हार्ट स्ट्रोक आणि कर्करोग यांसारख्या जुनाट आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे, तुम्ही धूम्रपान करत असाल किंवा खूप मद्यपान करत असाल तर ताबडतोब सोडा. यामध्ये तुम्हाला मदत करण्यासाठी अनेक औषधं आणि संस्था मदत करू शकतात.

(वाचा :- Sperm Count & Quality : सावधान, ‘या’ एका चुकीमुळे पुरूषांची स्पर्म क्वॉलिटी होतीये खराब, झपाट्याने वाढतायत नपुंसकतेची प्रकरणं..!)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.