नांदेडः जिल्ह्यातील इस्लामपूर वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या वन क्षेत्रामधील दत्ता पोहेकर यांच्या विहिरीत हरणाचे पिल्लू पडले. ही घटना २४ जानेवारी रोजी दुपारी दोन ते तीनच्या सुमारास घडली. या पिल्लाला वाचवण्यासाठी नागरिकांनी इस्लापूर वन विभागाला दिली.

इस्लापूर वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धनगे व वनपाल व्ही एस गुद्दे वनरक्षक अकबर सय्यद यांनी घटनास्थळी धाव घेतली. हरणाला वाचवण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धनगे व वनपाल व्हि. एस गुद्दे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अकबर सय्यद यांनी आपला जीव धोक्यात घालून विहिरीत उतरून हरणाच्या पिल्लाला सुरक्षित बाहेर काढले.

वाचाः महाराष्ट्रात २९ जानेवारीनंतर थंडीची लाट; मुंबई-पुण्यासाठी काय आहे हवामान विभागाचा अंदाज

घाबरलेल्या हरणाच्या पिल्लाची सर्व प्रथम तपासणी करून हरणाच्या निवासस्थानी त्या पिल्लाला सुरक्षित सोडण्यात आले. सध्या जंगलातील काही ठिकाणचे पाणवठे आटले आहेत. त्यामुळं पाण्याच्या शोधत वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. असाच एक हरणाचा कळप या परिसरात आला होता. या कळपातील हरणाचे एक पिल्लू चुकून पोहेकर यांच्या विहिरीत पडले.

वाचाः महाराष्ट्रात कडाक्याची थंडी, पण विदर्भात अस्मानी संकट, ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता

सध्या कडाक्याची थंडी असल्याने विहिरीत पडलेले हे पिल्लू गारठून गेलं होतं. या घटनेची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी वन विभागाला दिली आणि तात्काळ वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन गारठलेल्या हरणाला विहिरीच्या बाहेर काढून त्याला जीवदान दिले. या प्रसंगी वनरक्षक के जी जाधव व्ही एस मुसळे यांनी मोलाची सहकार्य केले. यावेळी शेत शिवारातील शेतकरी उपस्थित होते. हरणाच्या पिल्लाला जीवदान मिळाल्याने वन विभागाचे कौतुक करण्यात आले.

वाचाः महिलेने पतीचा झोपेतच मृत्यू झाल्याचं सांगितलं, नंतर घडलं असं काही की पत्नीला झाली अटकSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *