मुंबई : ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्यावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. या दोघांची ऑनस्क्रीन जोडी तर प्रेक्षकांना आवडलीच. आता ही जोडी ऑफस्क्रीन म्हणजे खऱ्या आयुष्यतही एकमेकांच्या आयुष्याचे जोडीदार होणार आहेत. छोट्या पडद्यावरील या लोकप्रिय जोडीनं अक्षय्य तृतीयाच्या दिवशी साखरपुडा केला.

राजू यांच्या पत्नी पुरत्या कोलमडल्या, रडून झाली वाईट अवस्था

या दोघांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर या दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला होता. आता लवकरच हे दोघं विवाहबंधनात अडकणार आहेत. अर्थात दोघं लग्न कधी करणार हे माहिती नाही. परंतु दोघांच्या केळवणांना सुरुवात झाल्यानं लवकरच ते लग्न बंधनात अडकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.


हार्दिक अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतो. त्याच्या कामाबद्दल तो चाहत्यांना पोस्टमधून माहिती देत असतो. आता देखील हार्दिकनं त्याच्या इन्स्टाग्रामवर काही खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो आहेत त्याच्या केळवणाचे. हार्दिकच्या बहिणीच्या घरी त्याचं पहिलं केळवण करण्यात आलं. हार्दिकनं जे फोटो शेअर केले आहेत, त्यात त्यानं गुलाबी रंगाचा झब्बा आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा घातला आहे. हार्दिकच्या समोर केळीच्या पानावर पारंपरिक महाराष्ट्रीय पद्धतीचे सुग्रास पदार्थ पद्धतीने वाढलेले दिसत आहेत. तर त्याच्या पाठीमागं भिंतीवर ‘हार्दिकचे केळवण’ असे केळीच्या पानावर लिहिलेलं दिसत आहे.

अशोक सराफ त्यावेळी असे वागले म्हणून…रवी जाधव कधीही विसरू शकत नाहीत ती भेट


हार्दिकनं फोटो शेअर करत ‘बहिणीकडून केळवणाची सुरुवात…’, अशी पोस्ट केली. हार्दिकनं शेअर केलेल्या फोटोंवर त्याच्या चाहत्यांनी भरभरुन कमेन्ट केल्या. काही नेटकऱ्यांनी आता लग्न कधी? लग्नाची तारीख काय? आम्हालाही लग्नाला बोलवं? अशा प्रकारच्या कमेंट केल्या आहेत. दरम्यान, अक्षया देवधर देखील बॅचरल पार्टीचा आनंद घेताना दिसत आहे. अक्षयानं काही हटके पद्धतीत ही पार्टी केली आहे. सध्या ती मित्र मैत्रिणींबरोबर आऊटिंगला गेली असून लग्नाआधीचे काही खास क्षण एन्जॉय करत आहे.


अक्षया आणि हार्दिक दोघं लवकरच ‘चतुरचोर’ या सिनेमात एकत्र दिसणार आहेत. या दोघांचा एकत्रित हा पहिलाच सिनेमा आहे. आता चाहते त्यांच्या सिनेमासाठी उत्सुक आहेतच पण त्याआधी लग्नासाठी जास्त उत्सुक आहेत.

‘रंगीला गर्ल’चा मराठी सिनेसृष्टीत कमबॅक, लवकरच झळकणार मराठी चित्रपटात

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.