हसन मुश्रीफ यांचा शरद पवारांवर पलटवार:अल्पसंख्यांक व्यक्तीच्या मागे का लागले? म्हणत प्रश्नचिन्ह; समरजित घाडगे यांना देखील इशारा
विधानसभा निवडणुकीत माझी लढाई ही नायक विरुद्ध खलनायक अशी असल्याचा दावा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. शरद पवार माझ्यासारख्या अल्पसंख्यांक समाजातील व्यक्तीच्या मागे का लागले? हे मला माहीत नाही, असे देखील मुश्रीफ यांनी म्हटले आहे. शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी समरजित घाडगे यांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते. यावर हसन मुश्रीफ यांनी पलटवार केला आहे. जयंत पाटील हे त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. ते परवाच या मतदारसंघात आले होते. त्यांची मतदारसंघात सभा देखील झाली होती. त्यानंतर आता शरद पवार देखील या मतदारसंघात आले आहेत. अजित पवार यांच्यासोबत आलेल्या आमदारांची संख्या मोठी आहे. असे असले तरी माझ्यासारख्या अल्पसंख्यांक समाजाच्या व्यक्तीच्या मागे शरद पवार का लागले॰ असा प्रश्न हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केला आहे. ‘पवार साहब आपसे मेरा बैर नहीं, पर समरजीत अब तुम्हारी खैर नहीं’ असा इशारही त्यांनी दिला आहे. शरद पवार कायमच जनतेतील नेत्याच्या मागे उभे राहिले माझी लढाई ही नायक विरुद्ध खलनायक असल्याचा दावा हसन मुश्रीफ यांनी केला आहे. समरजित घाडगे यांना देखील त्यांनी इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांनी अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभाग घेतला होता. या आमदारांची संख्या आता 50 च्या वर गेली आहे. मात्र, तरी देखील शरद पवार हे माझ्याच मागे का लागले? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. शरद पवार यांची आतापर्यंतची सर्व भाषणे पाहून घ्या, ते कायमच जनतेतील नेत्याच्या मागे उभे राहिले आहेत. ते राजाच्या मागे कधी उभे राहत नाही, असा दावा देखील हसन मुश्रीफ यांनी केला आहे. या मतदारसंघांमध्ये आतापर्यंत अनेक वेळा एकास एक अशी निवडणूक झाली असल्याचा दावा करत, त्यांनी विजयाचा विश्वास देखील व्यक्त केला. मागिल निवडणुकींचा दाखला कागल विधानसभा मतदारसंघाबाबत बोलताना मुश्रीफ यांनी मागिल निवडणुकींचा दाखला दिला. माझ्या सहा निवडणुका झाल्या आहेत. त्यामध्ये एकूण तीन वेळा एकास एक सामना झाला आहे. तिरंगी लढत ही केवळ मागच्याच वेळी झाली होती. त्यामुळे मला त्याचा फायदा झाला होता, असे म्हणणे चुकीचे असल्याचे देखील हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी या विरोधात वक्तव्य केले होते, त्याच्यावर देखील मुश्रीफ यांनी पलटवार केला आहे.