नागपूर : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारतीय संघाने आता चांगलीच कंबर कसली आहे. यापूर्वी नागपूरमध्ये झालेल्या सामन्यात ज्या मॅचविनरने हॅट्रीक घेत सामना फिरवला होता, त्या खेळाडूला आता दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात संधी मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

या दुसऱ्या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराचे पुनरागमन होणार अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पण या सामन्यात जर भारताला विजय मिळवायचा असेल तर बुमराबरोबर या मॅचविनर खेळाडूला संधी मिळू शकते. यापूर्वी या खेळाडूने बरेच सामने गाजवले आहेत. यापूर्वी झालेल्या सामन्यात तर या खेळाडूने हॅट्रिकसह सहा बळी मिळवले होते. त्यामुळे या सामन्यात त्याचे पुनरागमन जवळपास निश्चित असल्याचे समोर येत आहे.

भारताने या मालिकेतील पहिल्या सामन्यात भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि उमेश यादव यांना संधी दिली होती. या सामन्यात बुमरालाही संधी मिळू शकते. पण त्याचबरोबर या सामन्यात दीपक चहरला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण आतापर्यंत भारतीय संघाने चहरला मोठ्या सामन्यांमध्ये संधी दिलेली नाही. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत त्याने पुनरागमन केले होते. त्यावेळी पहिल्याच सामन्यात तो मॅचविनर ठरला होता. त्यानंतर आता या सामन्यात तो पनरागमन करू शकतो. यापूर्वी नागपूरमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये सामना झाला होता. या सामन्यात चहरने ३.२ षटकांत फक्त सात धावा दिल्या होत्या आणि तब्बल सहा फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता. चहरच्या या कामगगिरीच्या जोरावर भारताने हा सामना ३० धावांनी जिंकला होता. त्यामुळे या सामन्यासाठी जर चहरला संधी दिली तर त्याचे मनोबल वाढू शकते आणि त्याचा फायदा भारताला होऊ शकतो.

या सामन्यात जर भारताला बुमरा आणि चहर या दोघांनाही संधी द्यायची असेल तर कोणाला संघाबाहेर करायचे, हा मोठा निर्णय भारतीय संघाला घ्यावा लागेल. भुवनेश्वर कुमारला या सामन्यात संघाबाहेर केले जाऊ शकते. पण उमेश यादव आणि हर्षल पटेल यांच्यापैकी कोणाला संघाबाहेर करायचे, हा निर्णय भारतीय संघाला घ्यावा लागेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.