वर्ल्ड हेड अॅंड नेक कॅन्सर डे (World Head and Neck Cancer Day) दरवर्षी 27 जुलै रोजी साजरा केला जातो. डोके आणि मानेचा कॅन्सर हा एक व्यापक गट आहे ज्यामध्ये तोंड (ओरल कॅविटी), जीभ, गाल, थायरॉईड, पॅरोटीड, टॉन्सिल्स, स्वरयंत्र (व्हॉइस बॉक्स) वर परिणाम करणारे कर्करोग समाविष्ट आहेत. भारतातील लोकांना प्रभावित करणारे कर्करोगाचे हे प्रकार सर्वात सामान्य मानले जातात. दिल्लीच्या फोर्टिस हॉस्पिटलमधील सर्जिकल ऑन्कोलॉजीचे संचालक आणि युनिट हेड डॉ प्रतीक वार्ष्णेय यांच्या मते, तंबाखूचे सेवन, धूम्रपान, मद्यपान आणि ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) संसर्ग ही या कॅन्सरमागील मुख्य कारणे आहेत. ही सर्व कारणे अशी आहेत की प्रतिबंध करणे शक्य आहे, त्यामुळे कर्करोग टाळता येऊ शकतो.

कॅन्सरची कारणे

जीवनशैलीत सुधारणा करून आणि व्यसन करण्यापासून दूर राहूनही हे कर्करोग टाळता येतात. तरुणांना तंबाखू सेवन, धूम्रपान आणि मद्यसेवनाच्या दुष्परिणामांबाबत जागरूक करणे अत्यंत आवश्यक आहे.

(वाचा :- पोट, कंबर व मांड्यांवरची चरबी मेणासारखी वितळेल, ‘या’ 5 गोष्टींचे कॉम्बिनेशन फॉलो करा, जिम व डाएटला मारा गोळी.!)

कॅन्सरची लक्षणे

स्क्रिनिंगमुळे अशा प्रकारचे कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यातच ओळखता येऊ शकतात. तोंडात असा घाव किंवा व्रण जो बरा होत नाही, आवाजात जडपणा, गिळण्यात अडचण, चेहरा किंवा मानेवर गाठ किंवा सूज येणे हे धोक्याचे लक्षण असू शकते आणि त्याची त्वरित तपासणी केली पाहिजे. अशा लक्षणांची तपासणी ऑन्कोलॉजिस्टने केली पाहिजे. कर्करोगाची पुष्टी करण्यासाठी अल्सर किंवा सूजलेल्या भागातून बायोप्सी केली जाते. यानंतर, कर्करोगाच्या टप्प्यानुसार, अल्ट्रासोनोग्राफी, सीटी / एमआरआय आणि पीएटी सीटी स्कॅनचा सल्ला दिला जातो.

(वाचा :- मंकीपॉक्सचं रौद्ररूप, स्त्री व पुरूषांच्या प्रायव्हेट पार्ट्सना करतोय टार्गेट, या 3 लक्षणांवर ठेवा बारीक नजर.!)

बचावासाठी उपाय

आक्रमकपणे सामुदायिक कार्यक्रम राबवून समाजाला तंबाखूमुक्त करता येईल. आपण तरूणांना तंबाखूपासून दूर राहण्याबद्दल शिक्षित केले पाहिजे. एचपीव्ही लसीकरणाने (मुले आणि मुली दोघांमध्ये) विषाणूजन्य कर्करोगाचा प्रतिबंध शक्य आहे. कर्करोगाचा प्राथमिक टप्प्यातच शोध लागल्यास डोकं आणि मानेचा कर्करोग विद्यमान तज्ञ आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने पूर्णपणे बरा होऊ शकतो.

(वाचा :- ब्लड प्रेशरच्या रूग्णांसाठी गुड न्युज, फक्त खा ‘हे’ 5 पदार्थ, रक्तवाहिन्या खुल्या होऊन 100 च्या स्पीडने धावेल रक्त)

कॅन्सरचा उपाय

सुरुवातीच्या टप्प्यात या प्रकारच्या कर्करोगावर शस्त्रक्रियेने पूर्णपणे उपचार केले जाऊ शकतात आणि कॉस्मेटिक आणि कार्यात्मक परिणाम देखील मिळू शकतात. कर्करोग प्रगत अवस्थेत असेल तर शस्त्रक्रियेव्यतिरिक्त रेडिओथेरपी आणि केमोथेरपी आवश्यक असते. या क्षेत्रांमध्ये आता लक्षणीय प्रगती झाली आहे त्यामुळे रेडिओथेरपी आणि केमोथेरपीचे दुष्परिणाम कमी झाले आहेत.

(वाचा :- लिव्हर व किडनी आतून सडतील व काम करणं करतील बंद, वेळीच खाणं बंद करा ‘या’ भाज्या नाहीतर वाढेल युरिक अ‍ॅसिड..!)

तंबाखू, दारू व धुम्रपान टाळा

कॅन्सरच्या शस्त्रक्रियेसाठी मिनिमली इनवेसिव्ह तंत्राचा वापर केल्यानेही चांगले परिणाम मिळतात आणि रुग्ण बराही लवकर होतो. थोडक्यात असे म्हणता येईल की डोके आणि मानेचा कर्करोग (हेड अॅंड नेक कॅन्सर) केवळ टाळता येण्याजोगा नाही तर बराही होऊ शकतो. त्यामुळे तंबाखू, दारू आणि धूम्रपान करणं टाळा. लक्षणे दिसू लागल्यास उशीर करू नका, वेळेवर तपासणी आणि उपचार करा.

(वाचा :- Monkeypox : बापरे, दिल्लीपर्यंत पोहचला मंकीपॉक्स, 2 रूग्णांमध्ये दिसली ही भयंकर लक्षणे, चुकूनही करू नका दुर्लक्षित)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.