वाचा: Budget Smartphones: आकर्षक डिझाईन, जबरदस्त फीचर्स आणि बजेट किमतीत येणाऱ्या ‘या’ स्मार्टफोन्सची लिस्ट एकदा पाहाच
HP च्या इन-इयर हेडफोन्स गेमिंग हेडफोन्सची किंमत:
HP च्या इन-इयर हेडफोन्स गेमिंग हेडफोन्सची भारतात किंमत २,००० रुपये असून Amazon हे डिव्हाइस ३१ % सवलतीसह त्यांच्या साइटवर विकत आहे. ज्यासह ते केवळ १३८३ रुपयांमध्ये खरेदी केले जाऊ शकतात. ग्राहकांना यासोबत पार्टनर ऑफर देखील दिली जात आहे. ज्यामध्ये १ HP प्रिंटर खरेदी केल्यास एक HP H200 वायर्ड हेडफोन विनामूल्य उपलब्ध असेल.
HP H200 वायर्ड गेमिंग हेडफोन्स:
हा एक प्रोफेशनल गेमिंग हेडसेट आहे. जो, स्टायलिश दिसतो आणि फक्त काळ्या रंगाच्या पर्यायात येतो. Device तुम्हाला गेम, चित्रपट, म्युझिक मधील आवाज सहजपणे अड्जस्ट करण्याची आणि कॉल व्हॉल्यूम अड्जस्ट करण्याची अनुमती देते. हे डिव्हाइस ३.५ मिमी ऑडिओ आउटपुटसह पीसी, लॅपटॉप आणि इतर डिव्हाइसेसशी सुसंगत आहे. यामध्ये High Sensitive मायक्रोफोन आहेत. जे संवाद साधण्यासाठी चांगला आवाज देतात. स्पष्ट आणि चांगल्या संभाषणासाठी त्यात अॅडजस्टेबल माइक देण्यात आला आहे. यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते नाविन्यपूर्ण 4D साउंड इफेक्ट देखील देतात.