निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या अडचणीत वाढ:शिखर बँक घोटाळ्यात क्लीन चिट विरोधातील याचिकेवर 5 ऑक्टोबरला सुनावणी

निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या अडचणीत वाढ:शिखर बँक घोटाळ्यात क्लीन चिट विरोधातील याचिकेवर 5 ऑक्टोबरला सुनावणी

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्यात देणाऱ्या क्लीन चिट देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आता 5 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. 25 हजार कोटी रुपयांच्या या शिखर बँक घोटाळ्यात अजित पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने सप्टेंबर 2020 मध्ये यासंबंधी अजित पवार यांना क्लीन चिट देत पहिल्यांदाच क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. आता या क्लीन चिटला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी होणार आहे. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या जनसन्मान यात्रा काढत आहेत. या निमित्ताने ते राज्यभर दौरा करत असताना त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या विशेष सत्र न्यायाधीश आदिती कदम यांच्या न्याय पीठासमोर शिखर बँक घोटाळ्याची सुनावणी सुरू आहे. याच सुनावणी दरम्यान मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. मात्र, त्या विरोधाचा चार याचिका मुंबई सत्र न्यायालयात दाखल झाल्या आहेत. यामध्ये माणिक भीमराव जाधव यांच्यासह अनिल विश्वासराव गायकवाड, नवनाथ साबळे आणि रामदास शिंदे यांनी ज्येष्ठ वकील सतीश तळेकर यांच्यामार्फत या चार स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. शिखर बँक घोटाळा प्रकरणातील घोटळा आणि क्लोजर रिपोर्ट प्रकरणाची सुनावणी आता 5 ऑक्टोबरला होणार आहे. जरंडेश्वर, जय अंबिका, जालना, पारनेर, कन्नड, प्रियदर्शनी, पद्मश्री विखे पाटील या सहकारी साखर कारखान्यांनी ही निषेध याचिका दाखल केली होती. मुंबई सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आता 5 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. फडणवीसांनी राज्याच्या संस्कृतीचे गजकर्ण केले:आज त्यांचे ‘गाढवही गेले, ब्रह्मचर्य गेले’ म्हणत उद्धव ठाकरे गटाचा हल्लाबोल फडणवीस व त्यांच्या मिंधे सरकारने शिवरायांचा सन्मान तर केला नाहीच, उलट शिवरायांचा अवमान होत असताना आपली तोंडेही शिवून ठेवली. एकंदरीत छत्रपती शिवराय अवमान प्रकरणात भाजप व त्यांच्या बगलबच्च्यांचे ढोंग उघडे पडले. त्यांना स्वतःवर गाढव होण्याची वेळ आली आणि त्यांचे ब्रह्मचर्यही निघून गेले. अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाने राज्य सरकारवर टीका केली आहे. पूर्ण बातमी वाचा…

​विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांना शिखर बँक घोटाळ्यात देणाऱ्या क्लीन चिट देण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आता 5 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. 25 हजार कोटी रुपयांच्या या शिखर बँक घोटाळ्यात अजित पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने सप्टेंबर 2020 मध्ये यासंबंधी अजित पवार यांना क्लीन चिट देत पहिल्यांदाच क्लोजर रिपोर्ट सादर केला होता. आता या क्लीन चिटला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी होणार आहे. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या जनसन्मान यात्रा काढत आहेत. या निमित्ताने ते राज्यभर दौरा करत असताना त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या विशेष सत्र न्यायाधीश आदिती कदम यांच्या न्याय पीठासमोर शिखर बँक घोटाळ्याची सुनावणी सुरू आहे. याच सुनावणी दरम्यान मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. मात्र, त्या विरोधाचा चार याचिका मुंबई सत्र न्यायालयात दाखल झाल्या आहेत. यामध्ये माणिक भीमराव जाधव यांच्यासह अनिल विश्वासराव गायकवाड, नवनाथ साबळे आणि रामदास शिंदे यांनी ज्येष्ठ वकील सतीश तळेकर यांच्यामार्फत या चार स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. शिखर बँक घोटाळा प्रकरणातील घोटळा आणि क्लोजर रिपोर्ट प्रकरणाची सुनावणी आता 5 ऑक्टोबरला होणार आहे. जरंडेश्वर, जय अंबिका, जालना, पारनेर, कन्नड, प्रियदर्शनी, पद्मश्री विखे पाटील या सहकारी साखर कारखान्यांनी ही निषेध याचिका दाखल केली होती. मुंबई सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर आता 5 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्याचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा…. फडणवीसांनी राज्याच्या संस्कृतीचे गजकर्ण केले:आज त्यांचे ‘गाढवही गेले, ब्रह्मचर्य गेले’ म्हणत उद्धव ठाकरे गटाचा हल्लाबोल फडणवीस व त्यांच्या मिंधे सरकारने शिवरायांचा सन्मान तर केला नाहीच, उलट शिवरायांचा अवमान होत असताना आपली तोंडेही शिवून ठेवली. एकंदरीत छत्रपती शिवराय अवमान प्रकरणात भाजप व त्यांच्या बगलबच्च्यांचे ढोंग उघडे पडले. त्यांना स्वतःवर गाढव होण्याची वेळ आली आणि त्यांचे ब्रह्मचर्यही निघून गेले. अशा शब्दात उद्धव ठाकरे गटाने राज्य सरकारवर टीका केली आहे. पूर्ण बातमी वाचा…  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment