हिंगोली जिल्हयात 30 पैकी 15 मंडळांमध्ये अतिवृष्टी:सोयाबीन, कापूस, उडीद, मुग, ज्वारी पिकांचे प्रचंड नुकसान, प्रशासनाकडून 48 तासापासून मदत अन बचाव कार्य सुरु

हिंगोली जिल्हयात 30 पैकी 15 मंडळांमध्ये अतिवृष्टी:सोयाबीन, कापूस, उडीद, मुग, ज्वारी पिकांचे प्रचंड नुकसान, प्रशासनाकडून 48 तासापासून मदत अन बचाव कार्य सुरु

हिंगोली शहरासह जिल्हाभरात प्रचंड पाऊस सुरुच असून ३० पैकी १५ मंडळांमध्ये ढगफुटी सदृष्य पाऊस सुरु आहे. प्रशासनाकडून मागील ४८ तासापासून मदत व बचाव कार्य सुरु असून सोमवारी ता. २ सकाळी डोंगरगाव, देवजणा येथील २० जणांना पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. आमदार संतोष बांगर यांनी स्वतः बोटीमध्ये जाऊन या गावकऱ्यांना बाहेर आणण्यास मदत केली आहे. हिंगोली जिल्हयात मागील ४८ तासापासून पाऊस सुरु आहे. या पावसामुळे जिल्हाभरात शेत शिवारांमधून पाणीच पाणी झाले आहे. सोयाबीन, कापूस, ज्वारी, उडीद, मुगाचे पिक पाण्याखाली असून काही ठिकाणी हळदीचे पिकही खरडून गेेले आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. विशेष म्हणजे उडीद, मुग काढणीला आले होते तर सोयाबीनचे पिक शेंगा लागण्याच्या अवस्थेत होते. जिल्हयात ३० मंडळापैकी १५ मंडळांमध्ये ढगफुटी सदृष्य पाऊस झाला असून त्यामुळे नदी, नाले, तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. सोमवारीही पावसाचा जोर कायम आहे. मागील चोविस तासात जिल्हयातील नर्सी नामदेव मंडळात १५३ मिलीमिटर, सिरसम १४९, बासंबा २२५, वाकोडी १५४, नांदापूर १६४, आखाडा बाळापूर १०६, वारंगा ११२, हयातनगर ८५, हट्टा ११३, कुरुंदा १११, सेनगाव १२४, आजेगाव ८०, साखरा १३३, पानकनेरगाव १३४ तर हत्ता मंडळात १६९ मिलीमटर पाऊस झाला आहे. दरम्यान, या पावसामुळे शेतातीत आखाड्यावर अडकलेल्या शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम सुुरु आहे. जिल्हाधिकारी अभिनव गोयल, पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्यासह अधिकाऱ्यांनी मागील ४८ तासापासून मदत व बचाव कार्यास सुरवात केली आहे. त्यासाठी विविध पथके स्थापन केली असून आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन केले जात आहे. वसमत तालुक्यातील टेंभुर्णी येथे सुभाष बाबुराव सवंडकर हा तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. त्यांचा मृतदेह पुराच्या पाण्यात आढळून आला आहे. तहसीलदार शारदा दळवी यांच्या पथकाने आज किनोळा कुरुंदा सह परिसरातील गावांना भेटी देऊन पाहणी केली आहे. पाऊस कायम राहिल्यास कुरुंदा येथील चारशे जणांना स्थलांतरित करण्याची तयारी प्रशासनाने केली असल्याचे तहसीलदार दळवी यांनी सांगितले दरम्यान, जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी तातडीची बैठक बोलावली असून जिल्हयातील नुकसानीची माहिती घेण्यास सुरवात केली आहे. या शिवाय पंचनामे करण्याबाबत सुचना दिल्याचे प्रशासनाच्या सुत्रांनी सांगितले. आमदार संतोष बांगर यांचे मदतीचे प्रयत्न आमदार संतोष बांगर यांनी डोंगरगाव, देवजना, चिखली येथील २२ जणांची आमदार संतोष बांगर यांनी रेस्क्यू पथकासोबत बोटीद्वारे आखाड्यावर जाऊन या सर्वांची सुखरूप सुटका केली. यामध्ये एका चार महिन्याच्या बालकासह महिला, मुली व शेतमजूरांचा समावेश आहे. आज सकाळपासून आमदार बांगर स्वतः रेस्क्यू पथकाला सोबत घेत मदत करीत असल्याचे चित्र आहे.

​हिंगोली शहरासह जिल्हाभरात प्रचंड पाऊस सुरुच असून ३० पैकी १५ मंडळांमध्ये ढगफुटी सदृष्य पाऊस सुरु आहे. प्रशासनाकडून मागील ४८ तासापासून मदत व बचाव कार्य सुरु असून सोमवारी ता. २ सकाळी डोंगरगाव, देवजणा येथील २० जणांना पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. आमदार संतोष बांगर यांनी स्वतः बोटीमध्ये जाऊन या गावकऱ्यांना बाहेर आणण्यास मदत केली आहे. हिंगोली जिल्हयात मागील ४८ तासापासून पाऊस सुरु आहे. या पावसामुळे जिल्हाभरात शेत शिवारांमधून पाणीच पाणी झाले आहे. सोयाबीन, कापूस, ज्वारी, उडीद, मुगाचे पिक पाण्याखाली असून काही ठिकाणी हळदीचे पिकही खरडून गेेले आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. विशेष म्हणजे उडीद, मुग काढणीला आले होते तर सोयाबीनचे पिक शेंगा लागण्याच्या अवस्थेत होते. जिल्हयात ३० मंडळापैकी १५ मंडळांमध्ये ढगफुटी सदृष्य पाऊस झाला असून त्यामुळे नदी, नाले, तलाव ओव्हरफ्लो झाले आहेत. सोमवारीही पावसाचा जोर कायम आहे. मागील चोविस तासात जिल्हयातील नर्सी नामदेव मंडळात १५३ मिलीमिटर, सिरसम १४९, बासंबा २२५, वाकोडी १५४, नांदापूर १६४, आखाडा बाळापूर १०६, वारंगा ११२, हयातनगर ८५, हट्टा ११३, कुरुंदा १११, सेनगाव १२४, आजेगाव ८०, साखरा १३३, पानकनेरगाव १३४ तर हत्ता मंडळात १६९ मिलीमटर पाऊस झाला आहे. दरम्यान, या पावसामुळे शेतातीत आखाड्यावर अडकलेल्या शेतकरी व त्यांच्या कुटुंबियांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम सुुरु आहे. जिल्हाधिकारी अभिनव गोयल, पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्यासह अधिकाऱ्यांनी मागील ४८ तासापासून मदत व बचाव कार्यास सुरवात केली आहे. त्यासाठी विविध पथके स्थापन केली असून आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या माध्यमातून रेस्क्यू ऑपरेशन केले जात आहे. वसमत तालुक्यातील टेंभुर्णी येथे सुभाष बाबुराव सवंडकर हा तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला होता. त्यांचा मृतदेह पुराच्या पाण्यात आढळून आला आहे. तहसीलदार शारदा दळवी यांच्या पथकाने आज किनोळा कुरुंदा सह परिसरातील गावांना भेटी देऊन पाहणी केली आहे. पाऊस कायम राहिल्यास कुरुंदा येथील चारशे जणांना स्थलांतरित करण्याची तयारी प्रशासनाने केली असल्याचे तहसीलदार दळवी यांनी सांगितले दरम्यान, जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी तातडीची बैठक बोलावली असून जिल्हयातील नुकसानीची माहिती घेण्यास सुरवात केली आहे. या शिवाय पंचनामे करण्याबाबत सुचना दिल्याचे प्रशासनाच्या सुत्रांनी सांगितले. आमदार संतोष बांगर यांचे मदतीचे प्रयत्न आमदार संतोष बांगर यांनी डोंगरगाव, देवजना, चिखली येथील २२ जणांची आमदार संतोष बांगर यांनी रेस्क्यू पथकासोबत बोटीद्वारे आखाड्यावर जाऊन या सर्वांची सुखरूप सुटका केली. यामध्ये एका चार महिन्याच्या बालकासह महिला, मुली व शेतमजूरांचा समावेश आहे. आज सकाळपासून आमदार बांगर स्वतः रेस्क्यू पथकाला सोबत घेत मदत करीत असल्याचे चित्र आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment