मुंबई : राज्यात आज अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे बळीराजा सुखावला आहे. तर शेतीच्या कामांनाही वेग आला आहे. अशात हवामान खात्याकडून आज अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनीही घराच्या बाहेर पडताना पावसाचा अंदाज घ्यावा, अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.

मुंबई आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातल्या २२ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये पालघर, ठाणे, रायगड, नंदुरबार, धुळे, जळगाव, लातूर, नांदेड, परभणी, जालना, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे तर उर्वरित महाराष्ट्रात मात्र हलक्याचे मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

लेकाच्या लव्ह ट्रँगलपुढे वडील पाघळले, प्रेमात अडथळे ठरणाऱ्या प्रेयसीच्या पतीचाच केला गेम अन्…
पुढच्या ३-४ तासांमध्ये पुणे आणि सातारा जिल्ह्यांमध्येही मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे घाट परिसरात मुसळधार पाऊस कोसळेल. खरंतर, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने राज्यात विश्रांती घेतली होती. पण अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे चक्रीय वादळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यभर पाऊस कोसळेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

पुढच्या ३-४ तासांमध्ये नंदुरबार, धुळे, नाशिक, नांदेड, जालना आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही तास या भागांमध्ये वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज घ्या आणि खबरदारी घ्यावी असाच अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस, फरशी पूल पाण्याखाली; नागरिकांचा पुराच्या पाण्यातून मुलाबाळांसहSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *