रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सच्या संघाचा कर्णधार आहे. मुंबई इंडियन्सच्या पराभवाच्या प्रमुख कारणांमध्ये कर्णधार रोहित शर्माचाही समावेश आहे. जगातील अव्वल फलंदाजांपैकी एक असलेला रोहित सलग दुसऱ्या प्लेऑफ सामन्यात अपयशी ठरला. मोठ्या धावसंख्येसमोर संघाला त्याच्याकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. पण रोहित शर्मा स्वस्तात बाद होत पॅव्हेलियनमध्ये परतला.
पीयूष चावला
पीयूष चावला हा आयपीएल २०२३ मध्ये मुंबईसाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता. पण या सामन्यात त्याने १५च्या इकॉनॉमीसह धावा खर्च केल्या. त्याच्या ३ षटकात त्याने ४५ धावा दिल्या.
ख्रिस जॉर्डन
४ षटकांत ५६ धावा देणाऱ्या ख्रिस जॉर्डनने तर या सामन्यात संघाला दुहेरी धक्का दिला. त्याने ४ षटकांत जबरदस्त धावा दिल्याचं. पण त्याने संघाचा दमदार सलमीवीर आणि यष्टीरक्षक इशान किशनला दुखापत केली. संपूर्ण मोसमात तो डेथ ओव्हर्समध्ये अपयशी ठरला. इशानच्या दुखापतीमुळे मुंबईला आपली संपूर्ण फलंदाजी बदलावी लागली. तसेच ईशान किशनच्या बॅटमधून येत असलेल्या धावा त्या सामन्यातही चांगल्याच उपयोगी ठरल्या असत्या.
विष्णू विनोद
ईशान किशनच्या जागी संघात समावेश करण्यात आलेल्या विष्णू विनोदला टेम्पो राखता आला नाही. ग्रीन बाद झाल्यानंतर खेळायला आलेल्या विष्णूला उघडपणे शॉट खेळता आले नाही आणि त्यामुळे सूर्यकुमार यादववर अधिक दडपण वाढले आणि सूर्यानंतर विनोद सुद्धा स्वस्तात बाद होत पॅव्हेलियनमध्ये परतला.
टीम डेव्हिड
पॉवरप्लेमध्येच टीम डेव्हिडने शुभमन गिलचा झेल सोडला. यानंतर गिळणे सगळ्यांची झोप उडवली आणि १२९ धावांपर्यंत मजल मारली. फलंदाजीतही त्याच्याकडे रशीद खानच्या चेंडूसाठी उत्तर नव्हते आणि तो स्वस्तात बाद झाला. सूर्यानंतर त्याच्यावर संघाची जबादारी होती पण डेव्हिड ३ चेंडूत त्याच्या बॅटमधून फक्त २ धावा आल्या.