मुंबई : बॉलिवूडमधील निर्माता सुनील दर्शन यानं अभिनेता सनी देओल याच्यावर आरोप केला आहे. सुनीलनं एका रेडिओ चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सनीबरोबरच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे. यावेळी सुनीलनं सांगितलं की, सनीनं त्याला फसवलं. सिनेमात काम करण्यासाठी म्हणून भरभक्कम मानधन घेतलं परंतु सिनेमात त्यानं काम केलंच नाही.

सुनील यांनी केलेले आरोप

आरजे सिद्धार्थ कन्नन याला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुनील दर्शन यानं सांगितलं की त्यानं निर्मिती केलेला सिनेमा योग्य शेवटाशिवाय त्याला प्रदर्शित करावा लागला होता. कारण या सिनेमाचं चित्रीकरण सुरू असतानाच मध्येच सनी लंडनला निघून गेला आणि बरेच दिवस परत आला नाही. इतकंच नाही तर मी सनीच्या करिअरमध्ये त्याला मदत करावी असं वचन त्यानं माझ्याकडून जबरदस्तीनं घेतलं होतं. हे वचन मी वर्षभरानंतर पूर्णदेखील केलं. त्यानं देखील माझ्या दुसऱ्या सिनेमात काम करण्याचं वचन दिलं होतं. त्यानं हा सिनेमा साईन केला आणि मी त्याला पैसे दिले.

निळू फुलेंच्या बायोपिकवर काम सुरू, दिग्दर्शक प्रसाद पण हिरो कोण?

भारतामध्ये परत आल्यावर सनी म्हणाला

सुनील दर्शनं यानं पुढं सांगितलं की, सनी जेव्हा भारतात परतला तेव्हा तो काम सुरू करेल असं वाटलं होतं, परंतु तसं झालं नाही. सुनील यांच्या म्हणण्यानुसार सिनेमाच्या विषयावर अधिक काम करायची गरज असल्याचं कारण सनीनं देत त्यात काम करायला नकार दिला. त्यानंतर सनीच्या हेतूबद्दल शंका आल्याचंही सुनील यांनी सांगितलं.

अक्षयचं नशीब पालटलं

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील ज्या सिनेमाबद्दल बोलत आहे तो ‘जानवर’ हा सिनेमा होता. या सिनेमात सनी देओलला अक्षयनं रिप्लेस केलं होतं. या सिनेमामुळे अक्षयचं नशीबच पालटून गेलं. सनी देओल आणि सुनील दर्शन यांनी अजय, लुटेरे, इंतकाम यांसारख्या सिनेमात काम केलं आहे. सनी देओल लवकरच ‘चुप रिवेंज ऑफ द आर्टिस्ट’ सिनेमात दिसणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन आर बाल्की यांनी केलं आहे. या सिनेमात दुलकर सलमान, पूजा भट्ट दिसणार आहेत. त्याशिवाय सनीकडे ‘गदर २’ देखील आहे. यात तो पुन्हा एकदा आमिषा पटेलबरोबर दिसणार आहे.

Health Update- राजू श्रीवास्तव यांना मुंबईत आणण्याची तयारी सुरू? 94174501Source link

Leave a Reply

Your email address will not be published.