हिंगोली पोलिसांचे गावठी दारु अड्डयावर धाडसत्र:24 ठिकाणी छाप्यात 1434 लिटर गावठी रसायन केले नष्ट

हिंगोली पोलिसांचे गावठी दारु अड्डयावर धाडसत्र:24 ठिकाणी छाप्यात 1434 लिटर गावठी रसायन केले नष्ट

हिंगोली जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांसोबतच स्थानिक गुन्हे शाखेच्या साध्या वे्शातील पोलिस पथकाने शनिवारी ता. २१ सकाळी २४ ठिकाणी गावठी दारु अड्ड्यावर छापे टाकून दारू गाळपासाठी लागणारे १४३५ लिटर सडके रसायन नाश केले आहे. याशिवाय १२० लिटर गावठी दारु व देशीदारुच्या ५९० बाटल्या जप्त केल्या आहे. या प्रकरणी २६ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. हिंगोली जिल्ह्यात ग्रामीण भागामधून मोठ्या प्रमाणावर गावठी दारुचे गाळप करून त्याची विक्री केली जात असून या सोबतच देशीदारुची अवैधरित्या विक्री होत असल्याच्या तक्रारी पोलिस विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सर्व तेरा पोलिस ठाण्यांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दारु अड्ड्यावर छापे टाकून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, राजेश मलपिल्लू, उपनिरीक्षक कपील आगलावे, विक्रम विठुबोने यांचे पथक स्थापन करण्यात आले होते. या शिवाय पोलिस ठाण्यांचीही पथके स्थापन केली होती. या पथकांनी आज पहाटेच गावठी दारु अड्डयावर छापे टाकले. यामध्ये २४ ठिकाणी छापे टाकून ५.३६ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. यामध्ये दारू गाळपासाठी लागणारे १४३५ लिटर सडके रसायन जप्त करून नाश केले तर १२० लिटर गावठी दारू व देशीदारूच्या ५९० बाटल्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी २६ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. जिल्ह्यामध्ये एक अप्पर पोलीस अधीक्षक, एक पोलीस उपाधीक्षक, 13 पोलीस अधिकारी, चार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी, वीस पोलीस उपनिरीक्षक, १३० पोलीस कर्मचारी यांची पथके नियुक्त करण्यात आली होती. या पथकांनी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास छापे टाकले. विशेष म्हणजे पोलिसांनी मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात गावठी दारूचे गाळप कोणत्या ठिकाणी होते याचा शोध घेऊन छाप्यासाठी ठिकाणे निश्चित केली होती. त्यानुसार या पथकाने छापे टाकले

​हिंगोली जिल्ह्यातील पोलिस ठाण्यांसोबतच स्थानिक गुन्हे शाखेच्या साध्या वे्शातील पोलिस पथकाने शनिवारी ता. २१ सकाळी २४ ठिकाणी गावठी दारु अड्ड्यावर छापे टाकून दारू गाळपासाठी लागणारे १४३५ लिटर सडके रसायन नाश केले आहे. याशिवाय १२० लिटर गावठी दारु व देशीदारुच्या ५९० बाटल्या जप्त केल्या आहे. या प्रकरणी २६ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. हिंगोली जिल्ह्यात ग्रामीण भागामधून मोठ्या प्रमाणावर गावठी दारुचे गाळप करून त्याची विक्री केली जात असून या सोबतच देशीदारुची अवैधरित्या विक्री होत असल्याच्या तक्रारी पोलिस विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सर्व तेरा पोलिस ठाण्यांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दारु अड्ड्यावर छापे टाकून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक विकास पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, राजेश मलपिल्लू, उपनिरीक्षक कपील आगलावे, विक्रम विठुबोने यांचे पथक स्थापन करण्यात आले होते. या शिवाय पोलिस ठाण्यांचीही पथके स्थापन केली होती. या पथकांनी आज पहाटेच गावठी दारु अड्डयावर छापे टाकले. यामध्ये २४ ठिकाणी छापे टाकून ५.३६ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. यामध्ये दारू गाळपासाठी लागणारे १४३५ लिटर सडके रसायन जप्त करून नाश केले तर १२० लिटर गावठी दारू व देशीदारूच्या ५९० बाटल्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी २६ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. जिल्ह्यामध्ये एक अप्पर पोलीस अधीक्षक, एक पोलीस उपाधीक्षक, 13 पोलीस अधिकारी, चार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी, वीस पोलीस उपनिरीक्षक, १३० पोलीस कर्मचारी यांची पथके नियुक्त करण्यात आली होती. या पथकांनी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास छापे टाकले. विशेष म्हणजे पोलिसांनी मागील दोन दिवसापासून जिल्ह्यात गावठी दारूचे गाळप कोणत्या ठिकाणी होते याचा शोध घेऊन छाप्यासाठी ठिकाणे निश्चित केली होती. त्यानुसार या पथकाने छापे टाकले  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment