हिंगोलीत काँग्रेसकडून 7 तर कळमनुरीतून 3 इच्छूकांनी मागितली उमेदवारी:वाद टाळण्यासाठी बैठक हदगावमध्ये, पक्षाचा सावध पवित्रा
हिंगोली येथे काँग्रेसच्या बैठकीत सतत होणाऱ्या वादाच्या घटनेमुळे पक्षाने सावध पवित्रा घेत रविवारी ता. २९ हदगाव येथे बैठक घेतली. या बैैठकीत हिंगोली विधानसभेतून सात तर कळमनुरीतून तीन इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. वसमतमधून दोन नाव समोर आल्याचे सुत्रांनी सांगितले. हिंगोली येथे काँग्रेस पक्षाकडून वेळोवेळी आयोजित करण्यात आलेल्या बैठकांना पक्षांतर्गत दुफळीमुळे गालबोट लागत होते. काही दिवसांपूर्वीच झालेल्या बैठकीत शहराध्यक्षाला मारहाण झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी चौघांवर हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पोलिस विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. हिंगोलीत होणाऱ्या वादामुळे पक्षाचे निरीक्षक देखील हतबल झाले आहेत. पक्षाचे मराठवाडा सहसन्वयक कुणाल चौधरी यांना गोंधळामुळे बैठकीतून काढता पाय घ्यावा लागला होता. तर पक्षाच्या काही नेत्यांनी बैठकीतून थेट घर गाठल्याचे चित्र होते. दरम्यान, आज अखील भारतीय काँग्रेस कमिटीने नियुक्त केलेले राज्यातील लोकसभा निरीक्षक टी. राम. मोहन रेड्डी, समन्वयक तातू देशमुख यांच्या उपस्थितीत हदगाव येथील उखळी मंगल कार्यालयात हिंगोली जिल्हयातील विधानसभेचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई, आमदार डॉ. प्रज्ञा सातव, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्यासह पक्षाचे जिल्हास्तरीय नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी हिंगोली विधानसभा मतदार संघातून सात इच्छूकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. यामध्ये माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर, सचिन नाईक, शामराव जगताप, विनायकराव देशमुख, सुधीर सराफ, प्रकाश थोरात, राजेश भोसले यांचा समावेश आहे. तर कळमनुरी विधानसभेतून जिल्हाध्यक्ष देसाई यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी जकी कुरेशी, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीष पाचपुते यांनी उमेदवारी मागितली आहे. वसमत मधून दोन इच्छूकांनी उमेदवारी मागितल्याचे सुत्रांनी सांगितले. दरम्यान, हदगाव येथे आढावा बैठक झाल्यामुळे कुठल्याही प्रकाराची गोंधळ निर्माण झाला नाही. त्यामुळे आता यापुढील जिल्हयाच्या बैठका जिल्ह्याच्या बाहेर घेतल्या जाणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.