सगळे इतिहासकार शरद पवारांच्या जवळचे:फावल्या वेळेत त्यांनी नवा इतिहास लिहावा, गोपीचंद पडळकरांचा खोचक टोला

सगळे इतिहासकार शरद पवारांच्या जवळचे:फावल्या वेळेत त्यांनी नवा इतिहास लिहावा, गोपीचंद पडळकरांचा खोचक टोला

सगळे इतिहासकार शरद पवारांच्या जवळचे आहेत, तसेच शरद पवारांनी फावल्या वेळेत नवा इतिहास लिहावा, अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. तसेच किल्ले रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीची सुरक्षा वाढवली पाहिजे, 20 पोलिस सुरक्षेसाठी तैनात केले पाहिजेत. वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत राज्य सरकारने ठाम भूमिका घ्यावी, असेही गोपीचंद पडळकर म्हणाले. गोपीचंद पडळकर म्हणाले, उदयनराजे यांच्याबद्दल नितांत आदर आहे, हे खुसपट ब्रिगेडने काढले आहेत. शरद पवारांना जवळच्या असलेल्या या संघटना विषय बाहेर काढतात. सगळे इतिहासकार पवार साहेबांच्या जवळचे आहेत. शरद पवारांनी फावल्या वेळेत नवा इतिहास लिहावा. एकदाच नवीन इतिहास लिहा, म्हणजे पुढच्या पिढ्यांना परत इतिहास लिहण्याची गरज नाही, असा खोचक टोलाही पडळकर यांनी लगावला आहे. पुढे बोलताना गोपीचंद पडळकर यांनी सध्या चर्चेत असलेल्या ‘फुले’ या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपटावर देखील परतिक्रिया दिली आहे. गोपीचंद पडळकर म्हणाले, जात बघून इतिहास काढायचा. नवीन इतिहासकार जागे झाले आहेत. नवीन इतिहासकार लॉंच झाले आहेत. ते इतिहासकार 250 रुपयांचे जॅकेट घालून फिरत असतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे सध्या आंदोलन सुरू आहे. यावर देखील पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पडळकर म्हणाले, एमपीएससीमध्ये अनेक पुढारी तयार झाले आहेत. विद्यार्थ्यांनी मला जर त्यांचा विषय दिला तर मुख्यमंत्री यांच्याशी मी बोलेन. राज्य सरकारने स्पर्धा परीक्षा क्लासेसबद्दल मुद्दा गांभीर्याने घेतला पाहिजे. अहिल्यादेवी पुण्यतिथी कार्यक्रमाला अजितदादांना बोलवणार नाही पुढे बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले, अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीच्या निमित्ताने शिवमल्हार क्रांती संघटनेच्या वतीने पुण्यश्लोक 300 या उपक्रमाच्या अंतर्गत ‘धनगरी नाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एकाचवेळी 50 हजार धनगरी ढोल वाजवून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद केली जाणार नोंद. पुण्यातील रेसकोर्स मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अजित पवार यांना नाही बोलवणार, हा कार्यक्रम राजकीय नाही, कोणाला बोलवावे हे समाजाला विचारून कळवू, असे ते म्हणाले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment