अफगाणिस्तानच्या डावात अजमतुल्ला उमरझाईने नाबाद ९७ धावा केल्या. अखेरच्या ३ चेंडूवर शतक पूर्ण करण्यासाठी त्याला ३ धावा हव्या होत्या पण त्याला एकही धाव घेता आली नाही. दरम्यान अफगाणिस्तानच्या एका खेळाडूने एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर केला. अफगाणिस्तानचा सलामीवीर इब्राहिम झारदानने ऐतिहासिक अशी कामगिरी केली. या सामन्यात त्याला फक्त १५ धावा करता आल्या असल्या तरी एक मोठा विक्रम त्याने स्वत:च्या नावावर केलाय.
वर्ल्डकपच्या इतिहासात २३ वर्ष पूर्ण होण्याआधी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत झारदान दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ब्रायन लाराला टाकले. लाराने १९९२च्या वर्ल्डकपमध्ये ३३३ धावा केल्या होत्या. झारदानच्या नावावर ३७६ धावा आहेत. विशेष म्हणजे त्याने सचिनचा देखील विक्रम मागे टाकला.
या यादीत सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी आहे. त्याच बरोबर तो चौथ्या स्थानावर होता. आता झारदान दुसऱ्या स्थानावर आल्याने सचिन पाचव्या स्थानावर गेलाय. सचिनने १९९२च्या वर्ल्डकपमध्ये २८३ धावा केल्या होत्या. तर १९९६च्या वर्ल्डकपमध्ये ५२३ धावा केल्या होत्या. यादीत उपुल थरंगा २९८ धावांसह चौथ्या स्थानावर आहे. सचिन, लारा यांच्यानंतर झारदान हा फक्त तिसरा फलंदाज आहे ज्याने २३ वर्ष पूर्ण होण्याआधी एका वर्ल्डकपमध्ये ३०० हून अधिक धावा केल्या.
२३ वर्ष पूर्ण होण्याआधी वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा
सचिन तेंडुलकर- ५२३ धावा, १९९६
इब्राहिम झारदान- ३७६ धावा, २०२३
ब्रायन लारा- ३३३ धावा, १९९२
उपुल थरंगा- २९८ धावा, २००७
सचिन तेंडुलकर- २८३ धावा, १९९२
विराट कोहली- २८२ धावा, २०११
रहमानुल्लाह गुरबाज- २८० धावा, २०२३
Read Latest Sports News And Marathi News