मुंबई: भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शानदार विजय नोंदवत विश्वचषक २०२३ च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मोहम्मद शमीने ऐतिहासिक स्पेल टाकला, ज्यामुळे टीम इंडियाने हा सामना ७० धावांनी जिंकला. वनडे फॉरमॅटमध्ये एका सामन्यात ७ विकेट घेणारा शमी पहिला भारतीय गोलंदाज ठरला. मात्र, तरीही शमीला एक खंत होती, जी त्याने सामन्यानंतर बोलताना सांगितली.

नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा (४७) आणि शुभमन गिल (८०) यांनी वेगवान सुरुवात करून दिली. त्यानंतर विराटने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ५० वे शतक पूर्ण करून इतिहास रचला. अय्यरने अवघ्या ७० चेंडूत १०५ धावा करत भारताची धावसंख्या ४०० च्या जवळ नेली. भारताने न्यूझीलंडसमोर ३९८ धावांचे डोंगराएवढे लक्ष्य ठेवले होते. न्यूझीलंड संघाने विजय मिळवला नसला तरी त्यांनी भारतीय संघाला कडवी झुंडज दिली.

शमीच्या मनात कोणती खंत?

मोहम्मद शमीला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. जेव्हा मिचेल आणि विल्यमसन खेळत होते तेव्हा भारत संकटात सापडला होता, चाहते घाबरले होते कारण मिशेल खूप वेगवान खेळत होता आणि धावा आणि चेंडूंचा फरक सतत कमी होत होता. दोघेही चांगली फलंदाजी करत असताना मोहम्मद शमीने बुमराहच्य गोलंदाजीवर विल्यमसनचा सोपा झेल सोडला. बुमराहच्या चेंडूवर विल्यमसनने शॉट खेळला, चेंडू बॅटला नीट लागला नाही आणि शमीसाठी एक सोपा झेल आला पण शमीला तो पकडता आला नाही. यानंतर संपूर्ण स्टेडियममध्ये एकच शांतात पसरली होती. सामन्यानंतर शमीने हा झेल सोडल्याची खंत त्याच्या मनात असल्याचे सांगितले.

सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर शमी म्हणाला, “जेव्हा तुम्ही विश्वचषकासारख्या मंचावर तुमच्या देशासाठी खेळत असता तेव्हा खूप छान वाटते. गेल्या दोन विश्वचषकांमध्ये आम्ही मध्येच बाहेर पडलो होतो आणि ते खूपच निराशाजनक होते. त्यामुळे यावेळी आम्ही विश्वचषक जिंकण्याचे आमचे स्वप्न साकार करण्याची संधी म्हणून पाहिले. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुन्हा अशी संधी मिळेल की नाही हे तुम्हाला कधीच माहीत नाही, त्यामुळे हातात आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेणे चांगले. तो झेल चुकवल्याबद्दल मला वाईट वाटत आहे, कारण खरे पाहता मी तो झेल सोडायला नको होता.”

वानखेडेवर राष्ट्रगीताचे सूर, भारतीय प्रेक्षकांचा ‘हाय जोश’

मोहम्मद शमीलाही न्यूझीलंडविरुद्ध भारताची पहिली विकेट मिळाली, त्याने दोन्ही सलामीवीरांना बाद करून चांगली सुरुवात करून दिली. त्याने डेव्हॉन कॉनवे (१३) आणि रचिन रवींद्र (१३) हे दोघेही विकेटच्या मागे झेलबाद केले. यानंतर जेव्हा डॅरिल मिशेल आणि केन विल्यमसन यांनी किवी डावाची धुरा सांभाळली ज्यामुळे भारतीय संघ चांगलाच अडचणीत आला. पण त्यानंतर शमीने त्याच षटकात विल्यमसन (६९) आणि टॉम लॅथम (०) यांना बाद करत सलग २ विकेट घेत टीम इंडियाला पुनरागमन करवून दिले. शमीने सामन्यात ७ विकेट घेतल्या, वनडे सामन्यात ७ बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *