ऐतिहासिक शंकरपटाची ‘शंभरी’:वसंतपंचमीच्या पावन पर्वावर बैलांच्या वेगाचा थरार अनुभवत गुंजणार ‘भिर्रर्रर्र..’ची आरोळी

मुंबई- कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पिंपळगाव / सडक येथे वसंतपंचमीच्या पावन पर्वावर पटसमिती अंतर्गत बैलांच्या शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. डोळ्याचे पारने फेडणाऱ्या मानाच्या बैलांच्या जंगी बिना तुतारीच्या शंकरपटाची सुरुवात फेब्रुवारीच्या 2 तारखेला होणार आहे. मध्यंतरी 2014-15 ते 2020-21 या सात वर्षाच्या काळात बैलांच्या शर्यतीवर न्यायालयाच्या बंदीमुळे खंड पडल्यानंतर सन 1920 ते 2025 असा शंभर वर्षाचा इतिहास या शंकरपटाला आहे. शताब्दी महोत्सव-२०२५ च्या पार्श्वभूमीवर पिंपळगावात ‘एक मैदान एक पट’ या पार्श्वभूमीवर शंकरपटाची ‘शंभरी’ साजरी होत आहे. झाडीपट्टीतील सर्वात मोठे आणि मानाचा शंकरपट शर्यतीचे पिंपळगाव / सडक येथील मैदान चार दिवस सळसळत्या उत्साहात न्हाऊन निघणार आहे. त्यामुळे झाडीपट्टीत पुन्हा एकदा शताब्दी महोत्सव-२०२५ मध्ये शंकरपटा निमित्त बैलांच्या शर्यतीत वाऱ्याच्या वेगाचा थरार अनुभवत भिर्रर्रर्र.. ची आरोळी गुंजणार आहे. दरम्यान, जवळपास सात वर्षापासून शंकरपटावर घातलेल्या बंदीमुळे ९६ वर्षापासून सुरु असलेला पिंपळगावातील शंकरपट इतिहासजमा होईल का असा प्रश्न पिंपळगावसह जिल्हावासियांना होता. सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली असल्याने २०१४ ते २०२१ – नंतर पिंपळगाव (सडक) येथील ऐतिहासिक शंकरपट ७ वर्षानंतर पुन्हा सुरू झाला. दरवर्षी वसंत पंचमीच्या दिवशी पिंपळगाव येथे पटाची दान बैलाच्या शर्यतीसाठी सज्ज होत असते . पिंपळगाव येथील जनतेसाठी शंकरपट हा एक उत्सव असतो. शंकरपट पाहण्यासाठी पंचक्रोशीतून लोक येत असतात. शंकरपटासोबत कृषी क्षेत्राशी संबंधित वेगवेगळ्या प्रदर्शनी, सांस्कृतिक कार्यक्रम, झाडीपट्टी रंगभूमी याची एक मेजवानी लोकांना मिळत असते. शंकरपटाचे आयोजन करण्याची सुरुवात पिंपळगावच्या शंकरपटाची शतकीय वाटचाल पट शौकिन, व्यवसाय व आर्थिक उलाढास राज्यस्तरीय कृषी व पशुपक्षी प्रदर्शन भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पिंपळगाव (सडक) येथे शंकरपटाच्या शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने दिनांक दोन ते पाच फेब्रुवारी 2025 कालावधीत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व कृषी विभाग व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने भव्य राज्यस्तरीय कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील व बाजूच्या जिल्ह्यातील तसेच बाहेरील साधारणतः चार – पाच लाखांपेक्षा अधिक मुख्यतः शेतकरी येणे अपेक्षित आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक (आत्मा) उर्मिला चिखले यांनी दिली. सांस्कृतिक परंपरा ही कायम ठेवली बैलगाडा शर्यत हा एक कृषी संस्कृतीचा एक भाग आहे मनोरंजन व हौस म्हणून शंकरपट ठेवला जात होता. अहिंसेचा विचार करून मुका प्राण्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेऊन शंकर पटाचे आयोजन करणे महत्वाचे आहे. सांस्कृतिक परंपरा ही कायम ठेवली जावी.
– सुनील फुंडे, अध्यक्ष, जिल्हा मध्यवर्ती बँक,भंडारा अटी शर्तीच्या अधीन राहून शंकरपटाचे आयोजन आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि म्हणून शंकरपट चालू म्हणजे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची पर्वणीच आहे. शंकरपटाच्या माध्यमातून घरोघरी पाहुणे मंडळी येतात आणि नवीन सोयरीक जुळून येण्यास सुद्धा मदत होते. गावात उत्सवाचे वातावरण असून शेतकरी वर्ग आनंदात आहे. अटी शर्तीच्या अधीन राहून शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे.” – बाळाभाऊ शिवणकर, सामाजिक कार्यकर्ता, पिंपळगाव/सडक गावकरी शेतकऱ्यांचा सण म्हणून भरवतात 26 जानेवारी 1920 यावर्षी पासून सुरू झालेला पट, पटावरील बंदी कायदया अंतर्गत सन 2014-15 पासून सन 2020-21 पर्यंत सदर पट सात वर्ष बंद होता. यापूर्वी सुद्धा 22/1/1969 ला जिल्हा कृषी प्रदर्शन व पशू प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते, यावर्षी शंभरावे वर्ष असून हा सण गावकरी शेतकऱ्यांचा सण म्हणून भरवला जात आहे. या पटाच्या उद् घाटनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री , भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री , लोकप्रतिनिधी, जिल्हास्तरावरील वरिष्ठ अधिकारी व जनता जनार्दन आपली उपस्थिती दर्शविणार आहेत. हा पट पाहण्यासाठी 2 फेब्रुवारीला अंदाजे 40 ते 50 हजार लोक , 3 फेब्रुवारीला 70 हजार ते एक लाख लोक , 4 फेब्रुवारीला सव्वा लाख ते दीड लाख लोक व 5 फेब्रुवारीला दीड लाख ते दोन लाख लोक राहतील, असा अंदाज आहे.
– नरेश नवखरे, अध्यक्ष, पट समिती, पिंपळगाव(सडक) पटाची दाण : एक मैदान एक पट • पटाच्या दाणीची एकूण पूर्व पश्चिम लांबी 1680 फूट आहे यापैकी पूर्व पश्चिम 1385 फुटाच्या अंतरात बैल बिना तुतारीने झेंडा व सिंगल यांचे अंतर धावणार आहेत, (बैलजोडी सुटण्याची खाच ते जिंकण्यासाठी असलेला सिंगल हे अंतर)
• उत्तर व दक्षिण दान सारखी लांबीला आहे.
• पटाच्या जागेची बॉर्डर सोडून प्रेक्षकांसाठी व पट शौकिनांसाठी दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे खाली जागा आहे, यामध्ये प्रेक्षक राहणार व पटशौकिन उभे राहून पट पाहणार आहेत.
• पुर्वेकडे झेंडा हालवण्याच्या मुंडयापासून ब्राम्हणकर च्या घराकडील रस्त्याकडे बैल बांधण्यासाठी जागा ठेवण्यात आली आहे.
• पश्चिमेकडे म्हणजे बैल जिंकण्यासाठी असलेल्या सिंगल पासून श्री अशोकजी शिवणकर यांचे शेताकडे जागा पटात बैल धावून झाल्यावर बैल बांधण्यासाठी जागा ठेवण्यात आली आहे.