गावांमधील आंबेडकरी चळवळीचा इतिहास बार्टीने जगासमोर आणावा:सम्राट अशोक प्रतिष्ठानची मागणी; बार्टी समन्वयक डॉ. बनसोड यांच्याशी चर्चा

गावांमधील आंबेडकरी चळवळीचा इतिहास बार्टीने जगासमोर आणावा:सम्राट अशोक प्रतिष्ठानची मागणी; बार्टी समन्वयक डॉ. बनसोड यांच्याशी चर्चा

गावांमधील आंबेडकरी चळवळीचा इतिहास बार्टीने जगासमोर आणावा, अशी मागणी सम्राट अशोक प्रतिष्ठानने महाराष्ट्र शासन संलग्नित डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड यांना सादर केलेल्या निवेदनात केली. डॉ. बनसोड हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य असून, काही दिवसांपूर्वीच त्यांची बार्टीच्या समन्वयकपदी नियुक्ती झाली. यानिमित्ताने प्रतिष्ठानतर्फे त्यांची भेट घेऊन स्वागतही करण्यात आले. सिनेट सदस्य डॉ. बनसोड यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांची बार्टीच्या समन्वयक पदी निवड करण्यात आली आहे. ते आंबेडकराइट्स हिस्ट्री असोसिएशनचे राष्ट्रीय महासचिव असून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राचेही समन्वयक आहेत. दरम्यान त्यांची सम्राट अशोक प्रतिष्ठानचे प्रा. विजय आठवले, प्रा. डॉ. बाळकृष्ण खंडारे, प्रा. सुनील कांबळे, प्रा. संदीप भोवते, प्रा. शैलेश इंगळे, अनिल गवई, मंदा सिरसाट आदींनी भेट घेतली. याप्रसंगी डॉ. संतोष बनसोड यांना निवेदन सादर करण्यात आले. महाराष्ट्रातील उपेक्षित बौद्ध वारसा स्थळे असून, यावर संशोधन करणे आवश्यक आहे. जेणेकरून हा वारसा समोर येईल. या वारसांचे संवर्धन होणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. तसेच आंबेडकरी चळवळीत गाव खेड्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी प्रचंड कार्य केले. मात्र, दुर्दैवाने अशा व्यक्तींचा इतिहास आजही दुर्लक्षित असून बार्टीतर्फे हा इतिहास समोर आणण्यासाठी डॉ. बनसोड यांनी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

​गावांमधील आंबेडकरी चळवळीचा इतिहास बार्टीने जगासमोर आणावा, अशी मागणी सम्राट अशोक प्रतिष्ठानने महाराष्ट्र शासन संलग्नित डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड यांना सादर केलेल्या निवेदनात केली. डॉ. बनसोड हे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य असून, काही दिवसांपूर्वीच त्यांची बार्टीच्या समन्वयकपदी नियुक्ती झाली. यानिमित्ताने प्रतिष्ठानतर्फे त्यांची भेट घेऊन स्वागतही करण्यात आले. सिनेट सदस्य डॉ. बनसोड यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांची बार्टीच्या समन्वयक पदी निवड करण्यात आली आहे. ते आंबेडकराइट्स हिस्ट्री असोसिएशनचे राष्ट्रीय महासचिव असून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्राचेही समन्वयक आहेत. दरम्यान त्यांची सम्राट अशोक प्रतिष्ठानचे प्रा. विजय आठवले, प्रा. डॉ. बाळकृष्ण खंडारे, प्रा. सुनील कांबळे, प्रा. संदीप भोवते, प्रा. शैलेश इंगळे, अनिल गवई, मंदा सिरसाट आदींनी भेट घेतली. याप्रसंगी डॉ. संतोष बनसोड यांना निवेदन सादर करण्यात आले. महाराष्ट्रातील उपेक्षित बौद्ध वारसा स्थळे असून, यावर संशोधन करणे आवश्यक आहे. जेणेकरून हा वारसा समोर येईल. या वारसांचे संवर्धन होणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. तसेच आंबेडकरी चळवळीत गाव खेड्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी प्रचंड कार्य केले. मात्र, दुर्दैवाने अशा व्यक्तींचा इतिहास आजही दुर्लक्षित असून बार्टीतर्फे हा इतिहास समोर आणण्यासाठी डॉ. बनसोड यांनी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment