गृहकर्जाचा कालावधी कसा वाढतो?
जेव्हा-जेव्हा व्याज दरात बदल होतो, तेव्हा गृहकर्जाची परतफेड करण्याची मुदत वाढते. बहुतेक लोक सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करतात. परंतु नंतर जेव्हा त्यांना कळते की त्यांच्या कर्जाचा कालावधी वाढला आहे, तेव्हा ते बँकेकडे तक्रार करतात.
उदाहरणाने अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊया
तुम्ही २० वर्षांसाठी ८% दराने ३० लाख रुपयांचे कर्ज घेतले तर तुमचा दरमहिना EMI सुमारे २५,०९३ रुपये असेल. बहुतांश बँका फ्लोटिंग रेटवर गृहकर्ज देतात म्हणजे रेपो द्रासह तुमच्या गृहकर्जाचा दरही बदलत राहील. गृहकर्ज घेतल्यानंतर पाच वर्षांनी तुमच्या गृहकर्जाचा दर ११% होईल असे गृहीत धरू. यावेळी तुमच्या गृहकर्जाची थकबाकी असलेली मूळ रक्कम सुमारे २६ लाख रुपये असेल, कारण सुरुवातीच्या वर्षांच्या ईएमआयमध्ये व्याजाचा वाटा जास्त, तर मूळ रकमेचा वाटा कमी असतो.
पाच वर्षांनंतर तुम्हाला असे वाटेल की आता EMI चा १५ वर्ष बाकी आहेत परंतु असे नाही. जसजसा व्याजदर वाढतो, तसतसा तुमच्या कर्जाच्या कालावधीनुसार समायोजित होतो. ग्राहकांवर जास्त ईएमआयचा भार पडू नये म्हणून हे केले जाते. बँकांनाही तेच करायचे आहे, कारण तुम्ही जितका जास्त वेळ EMI भरत राहाल तितकी बँकेची तुमच्याकडून जादा कमाई होईल. त्यामुळे तुमचा ईएमआय पूर्वीप्रमाणेच २५,०९३ रुपयांच्या जवळ ठेवल्यास तुमच्या कर्जाचा उर्वरित कालावधी १५ वर्षे नसून २८ वर्षे असेल.
याशिवाय जर तुमचा ईएमआय १५ वर्षांच्या दृष्टीने पाहिला तर तुमचा ईएमआय सुमारे २९,५०० रुपयांपर्यंत वाढेल. अशाप्रकारे तुम्हाला २० वर्षांत जे परतफेड करायची होती त्याची परतफेड करण्यासाठी तुम्हाला सुमारे ३३ वर्षे लागतील.
अशा परिस्थितीतून स्वतःला कसे वाचवायचे
तुमच्या गृहकर्जाचा कालावधी वाढू नये यासाठी जेव्हाही व्याजदर वाढतील तेव्हा बँकेशी बोलून तुमच्या कर्जाची पुनर्रचना करा म्हणजेच बँकेला मुदत वाढवायला न सांगता नवीन व्याज दरानुसार ईएमआय वाढवायला सांगितले तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. बहुतेक ग्राहक हीच चूक करतात आणि बँकेकडून कर्जाची पुनर्रचना करत नाहीत ज्यामुळे त्यांच्या कर्जाचा कालावधी वाढतो.