मुंबई: चंदीगड विद्यापीठातील एमएमएस प्रकरण ताजं असतानाच आता मुंबईतही तसाच प्रकार घडला आहे. मुंबईतील पवई आयआयटीमध्ये महिलांच्या शौचालयात डोकावताना एका व्यक्तीला पकडण्यात आलं आहे. पवई पोलिसांनी या डोकावणाऱ्याला अटक केली आहे.

आयआयटी बॉम्बेची एक विद्यार्थीनी टॉयलेटमध्ये असताना खिडकीतून आरोपी डोकावत असल्याची घटना रविवारी रात्री समोर आली आहे. आयआयटी बॉम्बेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

हेही वाचा –घृणास्पद! महिला खेळाडूंचं जेवण शौचालयात ठेवलं, VIDEO पाहून सोशल मीडियावर संताप

पिंटू गरिया असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अटक करण्यात आलेली व्यक्ती कॅन्टीनमध्ये काम करत असून त्याच्यावर गुन्हा नोंदवून त्याला अटक केल्याची माहिती झोन १० चे डीसीपी महेश्वर रेड्डी यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंटू गरीया (२६) असे आरोपीचे नाव असून रविवारी हॉस्टेल क्रमांक १० येथे काही मुली बसल्या होत्या. यावेळी हॉस्टेलच्या पाठीमागील खिडकीतून पिंटू डोकावत असल्याचे त्यांनी पाहिले आणि आरडाओरड केली. हे ऐकून सुरक्षारक्षक त्या ठिकाणी आले आणि पिंटूला ताब्यात घेतले.

हेही वाचा –Mohali University Case: विद्यार्थीनींच्या MMS लीक प्रकरणी मोठे अपडेट, पोलिसांच्या कारवाईने खळबळ

तरुणींच्या तक्रारीवर पवई पोलिसांनी विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली. पिंटू आयआयटीमधील कॅन्टीनमध्ये काम करतो. कोणत्याही प्रकारचे रेकॉर्डिंग अथवा छेडछाड झाली नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

जखमी अवस्थेत नातेवाईकांनी ‘तिला’ कचरा कुंडीत आणून सोडलं; माणुसकीचं विदारक सत्यSource link

Leave a Reply

Your email address will not be published.