नवी दिल्ली : पती-पत्नीचे नाते साता जन्माचे असते असं म्हटलं जातं. आयुष्याच्या प्रवासात एकाने अचानक साथ सोडली तर ते दुःख मोठं असतं. राजू श्रीवास्तव यांची पत्नी शिखा यांच्यावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजू यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला, पण अभिनेत्याच्या निधनाने सर्वात जास्त कोणाला दुःख झालं असेल तर ती त्यांची पत्नी शिखा. राजू यांच्या मृत्यूने शिखा पूर्णपणे कोलमडून गेल्या आहेत.

राजूची बायको घाटावर पोहोचली, तिच्या डोळ्यात पाणी आले

राजू यांच्या पत्नीचा एक फोटो समोर आला आहे. फोटोमध्ये शिखा यांच्या चेहऱ्यावर राजूंना गमावल्याचे दु:ख स्पष्ट दिसत आहे. शिखा यांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नाहीत आणि त्यांच्या चेहऱ्यावरची निराशा पाहून कोणाचेही हृदय पिळवटून येते. एकमेकांवर जीव ओवाळून टाकणारी राजू आणि शिखा यांची जोडी तुटली आहे. राजू यांच्या जाण्याने त्यांच्या पत्नी एकाकी झाल्या.

राजू श्रीवास्तव यांचा मृत्यू कसा झाला, सगळं ठीक होत असताना अचानक काय झालं?

राजू यांच्या मृत्यूनंतर पत्नी म्हणाल्या-

राजू यांच्या मृत्यूबद्दल बोलताना शिखा म्हणाल्या होत्या की, ‘मी सध्या बोलण्याच्या स्थितीत नाही. आता मी काय बोलू? तो खूप लढला. मी प्रार्थना करत होते आणि मला आशा होती की तो त्यातून बाहेर येईल. पण हे होऊ शकले नाही. मी एवढेच म्हणेन की तो खरा लढवय्या होता.’

शिखा श्रीवास्तव


राजू यांचे पत्नीवर होते प्रेम

राजू श्रीवास्तव यांचे आपल्या पत्नीवर निस्सीम प्रेम होते. दोघांची प्रेमकहाणी चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नव्हती. आपल्या पत्नीचे मन जिंकण्यासाठी राजू यांनी तब्बल १२ वर्ष प्रतीक्षा केली होती. खरंतर, राजू यांनी आपल्या भावाच्या लग्नात शिखा यांना पहिल्यांदा पाहिलं होतं आणि तेव्हाच ते त्यांच्या प्रेमात पडले होते. राजू यांना स्वतः प्रेम व्यक्त करण्याचे धाडस नव्हते यामुळे घरातील सदस्यांमार्फत त्यांनी लग्नाची बोलणी केली. मग अशा प्रकारे राजूची प्रेमकहाणी पूर्ण झाली आणि १९९३ मध्ये त्यांनी शिखा यांच्याशी लग्न केले. मात्र आता राजू यांच्या जाण्याने शिखा एकाकी झाल्या.

राजू श्रीवास्तव यांचा मुलगा

कोमात गेल्यावर काय होतं, काहीसे असे होते राजू श्रीवास्तव यांचे शेवटचे ४० दिवस

भरलेल्या डोळ्यांनी राजूंना दिला अखेरचा निरोप

राजू श्रीवास्तव यांना आज दिल्लीतील निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शिखा राजू यांना निरोप देण्यासाठी तिथे गेल्या होत्या. त्या सतत रडत होत्या. अभिनेत्याच्या कुटुंबियांसह त्यांचे चाहतेही घाटावर पोहोचले होते. प्रत्येकाने ओलसर डोळ्यांनी आपल्या आवडत्या विनोदी कलाकाराला अखेरचा निरोप दिला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.