अभिनेते पंकज त्रिपाठी आज बॉलिवूड स्टार आहेत. आपल्या अभिनयाने, मेहनतीने त्यांनी इंडस्ट्रीत स्वत:चं मोठं नेम-फेम कमावलं. नावात काय आहे? असं म्हटलं जातं, पण या अभिनेत्याने कित्येक वर्षांपूर्वी त्यांच्या नावात मोठा बदल केला. त्यावेळी असं काही झालं की पंकज तिवारीचे ते पंकज त्रिपाठी झाले. बॉलिवूड, टॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी इंडस्ट्रीत आल्यानंतर स्वत:च्या केवळ नावात बदल केले. पण पंकज त्रिपाठी यांनी त्यांचं नाव न बदलता केवळ आडनाव बदललं. जन्माने पंकज तिवारी असलेल्या अभिनेत्याने त्यांच्या आडनावात बदल करुन ते त्रिपाठी करुन घेतलं. अभिनेत्याने केवळ त्यांच्याच आडनावात नाही, तर त्यांच्या वडिलांच्याही आडनावात बदल केले. त्यांनी वडिलांच्याही सर्व सर्टिफिकेटवरील आडनाव तिवारी काढून त्रिपाठी केलं. आडनाव बदलण्यामागे कारणही तसंच आहे.
Source link
