अहमदनगर: श्रीगोंदा शहरातून पत्नी बेपत्ता झाल्याचा बनाव करून स्वतःच्या अनैतिक प्रेम संबंधात अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा खून करणाऱ्या पारगाव येथील ज्ञानदेव आमटे याच्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने घराजवळ खड्डा करून प्रेत पुरून पत्नी बेपत्ता झाल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली होती. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पारगाव येथील ज्ञानदेव पोपट आमटे याचे गावातीलच एका महिलेशी बऱ्याच दिवसांपासून अनैतिक संबंध होते. या बेकायदेशीर प्रेम संबंधाची पत्नी रुपाली आमटे वारंवार चौकशी करत असल्याचा रागातून ज्ञानदेव याने स्वतःच्या पत्नीला बेदम मारहाण करून तिचा नियोजनबद्ध खून केला. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी मयत रूपालीचा मृतदेह कापडामध्ये बांधून घराजवळ खड्डा करून ज्ञानदेवने पुरला. त्यानंतर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात येऊन मी स्वतः मयत पत्नी रूपालीला चारचाकी गाडीत घेऊन शहरातील एका ब्युटी पार्लर मध्ये सोडले होते. नंतर तिला घेण्यासाठी पुन्हा आलो असता ती बेपत्ता झाली, अशी तक्रार त्याने दिली होती. याशिवाय घटनेनंतर तो तिला शोधण्यासाठी फिरत होता.याबाबत आरोपी ज्ञानदेव पोपट आमटे याच्याविरुद्ध याच्यावर पत्नी रूपालीच्या खुनासह पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. प्रकरणी भादवी कलम ३०२ व २०१ नुसार मयत रुपाली हिचा भाऊ रोहित संतोष मडके याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ज्ञानदेव पोपट आमटे हा फरार झाला होता. पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. आरोपी हा अहमदाबाद, गुजरात येथे असल्याची माहिती मिळाली. पथक त्याच्या शोधार्थ गुजरात राज्यात गेले. हा आरोपी हा वेळोवेळी वास्तव्याचे ठिकाण बदलत होता. त्याचा पथकाने तांत्रिक विश्लेषणाचे आधारे गुजरात राज्यातील विविध ठिकाणचे हॉटेल, लॉजेस आणि टोल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजचे आधारे आरोपीचा शोध घेता तो मिळून आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेतले. सदरील घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संपत कण्हेरे करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *