पालघरः पतीच्या अनैतिक संबंधाबाबत कळताच पत्नीने पतीच्या प्रेयसीच्या नवऱ्याच्या मदतीने अनैतिक संबंध असलेल्या आपल्या पतीची हत्या केल्याची घटना पालघर जिल्ह्यात घडली आहे. संतोष रामा टोकरे (वय ३५) असे मृतकाचे नाव असून याप्रकरणी वाडा पोलिसांनी पत्नीसह पाच जणांना अटक केली आहे.

वाडा तालुक्यातील कोंढले- बांधनपाडा येथील संतोष रामा टोकरे (वय ३५) यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी आढळून आला होता. त्यांनतर त्यांचा झोपेतच मृत्यू झाल्याची फिर्याद वाडा पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. मात्र, मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता डोक्यात हत्याराने वार करून व गळा दाबून संतोष टोकरेचा खून केल्याची बाब वैद्यकीय अहवालात समोर आली. त्यानंतर याप्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात भादंविस कलम ३०२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी वाडा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेचे वेगवेगळी पथके स्थापन करण्यात आली.

वाचाः महाराष्ट्रात कडाक्याची थंडी, पण विदर्भात अस्मानी संकट, ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता
संतोष रामा टोकरे याचे एका विवाहित महिलेसोबत अनैतिक संबंध होते. त्यामुळे पती- पत्नी यांच्यात वारंवार खटके उडत होते. पतीच्या अनैतिक संबंधाला वैतागून पत्नीने अनैतिक संबंध असलेल्या महिलेच्या पतीशी संगनमत करून संतोष टोकरे यांच्या हत्येचा कट रचला व संतोष टोकरे याच्या डोक्यात वार करून, गळा दाबून राहत्या घरी हत्या केल्याची बाब पोलीस तपासात उघड झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी संजीवनी टोकरे व अन्य चार जणांना अटक केली आहे. नितीन मधुकर सवर, स्वप्निल पुंडलिक मढवी, सतीश भाऊ मारगे, रोहित जाधव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वाचाः प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सुरू असतानाच सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्न; शहरात एकच खळबळ

वाचाः महाराष्ट्रात २९ जानेवारीनंतर थंडीची लाट; मुंबई-पुण्यासाठी काय आहे हवामान विभागाचा अंदाजSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *