घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका:एका मिनिटात सरळ झाल्याशिवाय राहणार नाही, नितीन गडकरी यांचा टोला

घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका:एका मिनिटात सरळ झाल्याशिवाय राहणार नाही, नितीन गडकरी यांचा टोला

माझ्या मुलांचे कल्याण करा, त्याला तिकीट द्या, बाकी काहीही झाले तरी चालेल. माझ्या बायकोला, पोरांना तिकीट द्या. हे का चालते? तर लोक त्यांना मत देतात, ज्या दिवशी लोक ठरवतील. हे जे वारसा हक्कांनी आलेले आहेत. त्यांना आम्ही मतदान करणार नाही. त्या दिवशी ते एका मिनिटात सरळ झाल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत नितीन गडकरी यांनी घराणेशाहीवरुन टोला लगावला आहे. नितीन गडकरी पुढे बोलताना म्हणाले की, कुणाचा मुलगा किंवा मुलगी असणे यात काही पाप किंवा पुण्य नाही. पण त्याने स्वत:ला सिद्ध करायला हवे, त्यानंतर लोकांनी म्हटले पाहिजे, तुमच्या मुलाला निवडणुकीला उभे करा. नागपुरातील आयुर्वेदावर आयोजित व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. संघातून चांगले संस्कार मिळाले वसुधैव कुटुंबकम्’ हे तत्त्व माननारी आपली संस्कृती आहे. आपण म्हणतो, विश्वाचे कल्याण होवो. आपण कधीच आपले कल्याण, मग आपल्या मुलांचे कल्याण आधी होवो, असे म्हणत नाही. पण राजकारणात काही लोक असे म्हणतात. हे उदाहरण देऊन नितीन गडकरी यांनी राजकारणातील घराणेशाहीवर टीका केली.तर मागील 45 वर्षात एअरपोर्टवर ना माझ्या स्वागतासाठी ना मला निरोप देण्यासाठी कुणी येते. निवडणूक जिंकल्यानंतरही माझ्या सत्काराचा कार्यक्रम होत नाही कारण हे मला आवडत नाही. मी जॉर्ज फर्नांडिस, अटल बिहारी वाजपेयी यांना माझे आदर्श मानतो. संघ आणि विद्यार्थी परिषदेतून मला चांगले संस्कार मिळाले आहेत. माझ्यात जे काही चांगले दिसतंय ते त्यामुळे आहे. माझा हेतू त्यामागे खराब नव्हता एका दुसऱ्या कार्यक्रमात नितीन गडकरींना तुम्ही भाजप अध्यक्ष असताना अमित शहा यांना वाट बघायला लावायचा, असा प्रश्न केला. यावर गडकरी म्हणाले की, माझ्या कार्यालयात 100-100 लोक भेटायला येतात. आज तुम्ही भेटायला आलात, तुम्हाला जास्त वेळ द्यायचा होता. त्यामुळे छोट्या व्यक्तींची कामे लवकर उरकून घेतली. मोठ्या लोकांना जास्त वेळ द्यायला लागायचा त्यामुळे वाट पाहावी लागते. तुम्हालाही आज पोहे खाऊन बसावं लागलं, परंतु माझा हेतू त्यामागे खराब नव्हता, असे म्हटले आहे.

​माझ्या मुलांचे कल्याण करा, त्याला तिकीट द्या, बाकी काहीही झाले तरी चालेल. माझ्या बायकोला, पोरांना तिकीट द्या. हे का चालते? तर लोक त्यांना मत देतात, ज्या दिवशी लोक ठरवतील. हे जे वारसा हक्कांनी आलेले आहेत. त्यांना आम्ही मतदान करणार नाही. त्या दिवशी ते एका मिनिटात सरळ झाल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत नितीन गडकरी यांनी घराणेशाहीवरुन टोला लगावला आहे. नितीन गडकरी पुढे बोलताना म्हणाले की, कुणाचा मुलगा किंवा मुलगी असणे यात काही पाप किंवा पुण्य नाही. पण त्याने स्वत:ला सिद्ध करायला हवे, त्यानंतर लोकांनी म्हटले पाहिजे, तुमच्या मुलाला निवडणुकीला उभे करा. नागपुरातील आयुर्वेदावर आयोजित व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. संघातून चांगले संस्कार मिळाले वसुधैव कुटुंबकम्’ हे तत्त्व माननारी आपली संस्कृती आहे. आपण म्हणतो, विश्वाचे कल्याण होवो. आपण कधीच आपले कल्याण, मग आपल्या मुलांचे कल्याण आधी होवो, असे म्हणत नाही. पण राजकारणात काही लोक असे म्हणतात. हे उदाहरण देऊन नितीन गडकरी यांनी राजकारणातील घराणेशाहीवर टीका केली.तर मागील 45 वर्षात एअरपोर्टवर ना माझ्या स्वागतासाठी ना मला निरोप देण्यासाठी कुणी येते. निवडणूक जिंकल्यानंतरही माझ्या सत्काराचा कार्यक्रम होत नाही कारण हे मला आवडत नाही. मी जॉर्ज फर्नांडिस, अटल बिहारी वाजपेयी यांना माझे आदर्श मानतो. संघ आणि विद्यार्थी परिषदेतून मला चांगले संस्कार मिळाले आहेत. माझ्यात जे काही चांगले दिसतंय ते त्यामुळे आहे. माझा हेतू त्यामागे खराब नव्हता एका दुसऱ्या कार्यक्रमात नितीन गडकरींना तुम्ही भाजप अध्यक्ष असताना अमित शहा यांना वाट बघायला लावायचा, असा प्रश्न केला. यावर गडकरी म्हणाले की, माझ्या कार्यालयात 100-100 लोक भेटायला येतात. आज तुम्ही भेटायला आलात, तुम्हाला जास्त वेळ द्यायचा होता. त्यामुळे छोट्या व्यक्तींची कामे लवकर उरकून घेतली. मोठ्या लोकांना जास्त वेळ द्यायला लागायचा त्यामुळे वाट पाहावी लागते. तुम्हालाही आज पोहे खाऊन बसावं लागलं, परंतु माझा हेतू त्यामागे खराब नव्हता, असे म्हटले आहे.  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment