[ad_1]

लखनऊ: विम्याच्या पैशांसाठी आपल्या मुलाच्या मृत्यूचा बनाव केल्याच्या घटनेचा त्याच व्यक्तीच्या नातेवाइकांनी भांडाफोड केल्याची घटना घडली आहे. अहमदाबाद पोलिसांनी दनकौरच्या परसौल गावातील रहिवासी अनिल मलिकच्या मृत्यूचा १७ वर्षांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी अनिलला ताब्यातही घेतलं आहे.

अनिलचे वडील विजयपाल आणि इतर भावांमध्ये गेल्या वर्षभरापासून जमिनीचा वाद सुरू होता. यामुळे अनिलचे काका धरमपाल यांनी रागाच्या भरात सहा महिन्यांपूर्वी गौतम बुद्ध नगर पोलिस आयुक्तांकडे अनिल जिवंत असल्याची तक्रार केली होती, मात्र पोलिसांनी हे प्रकरण मिटवले होते.

नोएडा पोलिसांनी या प्रकरणी कारवाई न केल्यावर धरमपाल यांनी अहमदाबाद क्राइम ब्रँचला अनिल जिवंत असल्याची माहिती दिली. तेथील पोलिसांनी तपास केला असता अनिलचे मास्टरमाईंड वडील विजयपाल यांनी २० वर्षीय मुलगा अनिलच्या मृत्यूचा बनाव करून ९० लाख रुपयांचा गंडा घातल्याचे निष्पन्न झाले. पोलिस आता वडील आणि भावाला अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत.

आजारी पत्नीला मिठी मारताना सिसोदियांना अश्रू अनावर, फोटो पाहून केजरीवालही झाले भावुक
नेमकं प्रकरण काय?

३१ जुलै २००६ रोजी अनिल मलिक, त्याचे वडील आणि भाऊ यांनी मिळून एका अपंग व्यक्तीला गाडीत बसवून अहमदाबादला नेले आणि तिथे त्याला जाळून मारले. परसौळ गावातही अनिलचा गाडीत जळल्याने मृत्यू झाल्याची माहिती मिळाली.

शवविच्छेदनानंतर वडिलांनी अपंग भिकाऱ्याचा मृतदेह गावी नेला नाही तर गाझियाबादच्या स्मशानभूमीतच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. गावकरी मृतदेहाची ओळख पटवतील अशी भीती त्यांना वाटत होती.

आरोपींनी अनिलच्या डेथ क्लेमचे ८० लाख रुपये आणि कारच्या विम्याचे १० लाख रुपये घेतले होते. यानंतर आरोपी १७ वर्षांपासून अहमदाबादमध्ये लपून राहत होता. अटक टाळण्यासाठी मास्टरमाइंड वडील अहमदाबादमध्ये तैनात असलेल्या आपल्या ओळखीच्या अधिकाऱ्याकडे विनंती करत आहेत.

उत्तरकाशीत मोठी दुर्घटना, निर्माणाधीन बोगद्याचा भाग कोसळला, ५० ते ६० मजूर अडकल्याची भीती
Read Latest Maharashtra News And Marathi News

[ad_2]

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *