बीड: जिल्ह्यातील केज तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या मुंडेवाडी येथील संगीता मुंडे यांनी जिल्हा परिषद शाळेत भात शिजवून आपली उपजीविका भागवली. शालेय पोषण आहार शिजवून जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलींच्या शिक्षणाचा भार संगीता मुंडे यांनी पेलला. संगीता मुंडे यांची मुलगी प्रांजली हिनं अत्यंत बिकट परिस्थितीतून एमपीएससी परीक्षेत यश संपादित केलं. तिची आता मुख्याधिकारी पदावर निवड झाली आहे. एका आजारात बालपणीच वडिलांचे निधन यामुळे प्रांजलीचं वडिलांचं छत्र हरवलं. मात्र, परिस्थिती बिकट असली तर काय झालं, मनात जिद्द आणि चिकाटी असेल तर यश संपादित करण्यासाठी परिस्थिती आड येत नाही हे प्रांजली हिनं दाखवून दिलं आहे.

केज तालुक्यात असलेलं अत्यंत दुर्गम भागात वसलेलं मुंडेवाडी हे प्रांजली मुंडे हिचं गाव आहे. ती लहान असताना तिचे वडील बाजीराव मुंडे यांचं निधन झालं. त्यामुळे तिच्यासह मोठ्या बहिणीच्या शिक्षणाची जबाबदारी देखील एकट्या आईवर पडली. प्रांजली मुंडे हिची आई संगीता मुंडे यांनी जेमतेम हाताशी असलेली कोरडवाहू शेती कसण्यासोबत गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहार बनवण्यासाठी स्वयंपाकी म्हणून काम सुरु केलं.याच कामातून मिळालेल्या आर्थिक आधारावर त्यांनी संसाराचा गाडा हाकला. त्यांनी दोन्ही मुलींना उच्चशिक्षित केलं.

प्रांजलीचे प्राथमिक शिक्षण हे मुंडेवाडी येथेच झाले. इयत्ता सहावी ते सातवी शिक्षण हे वाघे बाबुळगाव पूर्ण केलं. प्रांजलीनं पुढं तर आठवी ते दहावी शिक्षण हे येळमघाट तालुका बीड या ठिकाणी पूर्ण केलं. तिनं अकरावी बारावीचं शिक्षण अंबाजोगाई येथी योगेश्वरी महाविद्यालयात पूर्ण केलं. तिची अभ्यासातली प्रगती पाहून आईने तिला पुणे येथील सर परशुराम महाविद्यालय येथे बीए शिक्षणासाठी प्रवेश घेऊन दिला. प्रांजलीनं पदवीच्या अभ्यासक्रमासोबतच तिने स्पर्धा परीक्षेची देखील तयारी सुरू केली. कोणत्याही खासगी शिकवणीचा आधार न घेता स्वतः जिद्द आणि चिकाटीने अभ्यास केला.

गाडीला वाळूमाफियाचा कट, रस्त्यात वाळू ओतली; बीड जिल्हाधिकाऱ्यांसोबत रात्री धक्कादायक प्रकार
प्रांजलीनं २०२० मध्ये एमपीएससीची पहिली परीक्षा दिली त्यात ती मुलाखतीपर्यंत गेली. परंतु, सहा गुण कमी मिळाल्याने अंतिम यादीत प्रांजलीची निवड होऊ शकली नव्हती. पहिल्यांदा आलेल्या अपयशाने तिने खचून न जाता दुसऱ्या प्रयत्नात २०२१ ची परीक्षा दिली त्यात तिला यश आले. नगरपालिका मुख्याधिकारी म्हणून तिची निवड झाली आहे. प्रांजली हिने मुंडेवाडी गावातील पहिली अधिकारी म्हणून मान पटकावला आहे. तिच्या या यशाबद्दल कुटुंबातील आणि ग्रामस्थांनी तिचे अभिनंदन देखील केले आहे.
Shubhman Gill: सचिन तेंडुलकरने शतकी कामगिरीनंतर शुभमन गिलच्या कानात काय सांगितलं?
पदवीसाठी प्रवेश घेतल्यापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना करोना काळात शिक्षणासह स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हे सर्व काही विस्कळीत झालं होतं. परंतु, त्यानंतर ही गरिबीची जाणीव ठेवून प्रांजलीनं जिद्दीने अभ्यास सुरू केला. पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे तीनही टप्पे यशस्वीरित्या पार करत अधिकारी होण्याचे स्वप्न प्रांजलीने पूर्ण केले आहे. या यशाचं श्रेय आईला जातं असं प्रांजली म्हणाली.

हिरो ठरले झिरो! त्या ५ जणांनीच केला मुंबई इंडियन्सचा विश्वासघात, तिसऱ्या खेळाडूने तर मातीच खाल्लीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *