जेव्हा आपण लग्न करून दुसऱ्याच्या घरी जातो तेव्हा तेथे आपल्याला सर्वच लोकांशी जमवून घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आजमवाव्या लागतात. अनेकदा तर जी लोकं लग्नाआधी खूप चांगली वागत असतात ती लग्नानंतर मात्र खूप जास्त बदलून जातात. असाच काहीसा अनुभव मला देखील आला. मी प्रेमविवाह केला आणि मी लग्न झाल्यावर खूप खुश होते कारण मला हवं तसं सासर आणि नवरा दोन्ही मिळालं होतं. माझ्या नवऱ्याची बहिण अर्थात माझी नणंद तर अगदीच मनासारखी आणि चांगली व्यक्ती होती.

आम्ही लग्नाआधीपासूनच एकमेकांना ओळखत होतो. तिला खायला, फिरायला आणि गप्पा मारायला खूप आवडतं. शिवाय ती एक बुद्धीमान आणि मज्जा मस्ती करून आनंदात राहणारी मुलगी होती. मला वाटलं होतं की लग्नानंतर नवऱ्यानंतर तीच माझी बेस्ट फ्रेंड होईल. पण लग्नाला काही काळ लोटला आणि हळूहळू तिचे बदललेले स्वरूप माझ्या समोर येऊ लागले. तिचा भयंकर चेहरा उघडा पडला ज्यामुळे माझ्या पायाखालची जमिनच सरकली. (सर्व छायाचित्रे सांकेतिक आहेत आणि गोपनीयतेच्या कारणामुळे आम्ही व्यक्तीची ओळख उघड करत नाही.)

तिची वागणूक बदलली

लग्नाआधी जी माझ्याशी अगदी प्रेमळ वागायची, तिची वागणूक हळूहळू माझ्या प्रती खूप जास्त बदलून गेली. लहान सहान गोष्टींमध्ये ती मला टोमणे मारू लागली, मला खुप त्रास देऊ लागली. मी काहीही केलेले तिला आवडायचे नाही. मात्र तुम्हाला विश्वास बसणार नाही की मी हे सगळं होऊन सुद्धा गेली 5 वर्षे तिच्या सोबत त्याच घरात राहते आहे. पण मी हे कसं केलं असले हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल ना? चला तर जाणून घेऊया. मी तुम्हाला सांगते आहे अशा लोकांशी डील कसं करावं त्याच्या खास गोष्टी!

(वाचा :- एकेकाळी माधुरी दीक्षित व संजय दत्तच्या लव्हस्टोरीच्या झडल्या होत्या जगभरात चर्चा, ‘त्या’ एका घटनेने तुटले नाते)

तिला घरची मुलगीच समजा

जरी मी आज एका घराची सून असली तरी माझ्या माहेरच्यांसाठी मी आजही त्यांची मुलगीच आहे आणि आजही जेव्हा मी तिकडे जाते तेव्हा अगदी राणी सारखी तिथे वावरते. माझ्याच अनुभवा वरून मला ही गोष्ट माझ्या नणंदेबाबत कळली. ती आज तिच्या घरात राहते आहे. इथे ती लाडात वाढलेली आहे आणि ती थोडा मज दाखवणे साहजिक आहे. कारण हे घर तिचे आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमच्या नणंदेशी वागाल तेव्हा तिला घरची मुलगी समजूनच तिच्याशी वागा, यामुळे वाद खूप कमी होतील.

(वाचा :- पुरूषहो, बॉयफ्रेंड कोणीही चालेल पण नवरा बघताना या गोष्टी नोटीस करतात मुली, 3 नंबरवरील मुली सहजासहजी पटणं अशक्यच)

स्वत:ला शांत ठेवा

सर्वात महत्वाचे म्हणजे भांडणे टाळण्याचा प्रयत्न करा आणि जरी भांडण झाले तर स्वत:ला शांत ठेवा. भांडून तुम्हाला काहीच मिळणार नाही. उलट तुम्हालाच सासरच्यांकडून नावे ठेवली जातील. तुमच्या पतीसमोर तर आपल्या नणंदेशी बिलकुलच भांडू नका. अनेकदा पती आपल्या बहिणींचीच बाजू घेतात त्यामुळे त्यांच्या समोर तर अजिबातच नणंदेशी भांडू नये. जर खूपच समस्या होत असेल तर एकदा शांतपणे आपल्या पतीशी बोलून घ्यावे आणि तुम्हाला होणारा त्रास त्याला सांगावा.

(वाचा :- माझी कहाणी : मी ज्या मुलीवर आकंठ प्रेम केलं ती माझी वहिणी बनणार आहे, भावाने माझं प्रेम व पत्नी दोन्ही हिरावलं..)

तुमची वागणूक बदलू नका

जर तुमची नणंद घरातील खूप लाडकी असेल तर तुम्ही तिच्या तोंडी न लागलेले उत्तमच, कारण साहजिकच ती काही नखरे करणार! आणि तुम्ही घरात आल्यानेआता आपलं महत्त्व कमी होत आहे असं नणंदेला वाटू शकतं. त्यामुळे तिला असं अजिबात जाणवू न देता तिला तिच्या आयुष्यात जगू द्यावं. जरी तुमच्यात आणि तिच्यात काही वाद झाले तरी सामंजस्याने तुम्ही ते सोडवण्यासाठी पुढाकार घ्या. मनात राग धरून ठेवून बदलणार काहीच नाही उलट जे आहे ते सुद्धा जात बिघडून जाईल. त्यामुळे या गोष्टीची खूप काळजी घ्या आणि संयमाने राहा.

(वाचा :- सचिन तेंडूलकर व अंजलीची लवस्टोरी ऐकून भारावाल, क्रिकेटचा ‘क’ माहिती नसणा-या मुलीसमोर का विरघळला क्रिकेटचा देव?)

तिला असुरक्षित वाटू लागते

सासरी गेल्यावर जसे मुलींचे जग पूर्णपणे बदलून जाते, तसाच परिणाम नणंदेच्या जीवनावरही होतो. कारण पूर्वी घरात ती एकटीच मुलगी असते. जिचा सर्वचजण खूप लाड करत असतात, तिला हवं नको ते सारं काही मिळत असतं. पण वहिणी आल्यावर ते प्रेम दोघींमध्ये वाटले जाते कारण सून ही सुद्धा एकप्रकारे घरातील लेकच असते. त्यामुळे नणंदेला असुरक्षित वाटणे स्वाभाविक आहे. पूर्वी जिथे तिचा भाऊ सतत तिच्या मागे मागे असायचा आता तोही आपल्याकडे नाही तर वहिणीकडे जास्त लक्ष देतो ही गोष्ट तिला खटकू लागते. घरातील सदस्यांची ही बदललेली वागणूक कोणत्याही मुलीला खूप त्रासदायक वाटू शकते हे देखील एक कारण आहे. सून या नात्याने तुम्ही हे कधीही विसरता कामा नये की, तुमचा तुमच्या कुटुंबातील सदस्यांवर जितका अधिकार आहे तितकाच अधिकार तिचा सुद्धा आहे.

(वाचा :- पार्टनरच्या झोपण्याच्या स्टाइलवरून ओळखू शकता त्याची पर्सनॅलिटी व स्वभाव, बघा या टेस्टमधून जुळतं का तुमचं नातं.!)

स्वत:वर नियंत्रण ठेवा

जेव्हा तुमचा स्वत:चा स्वभाव शीघ्रकोपी असतो तेव्हा अशा स्थितीत शांत राहणे जमत नाही. पण त्यावर कंट्रोल करायला तुम्ही शिकले पाहिजे. खासकरून तेव्हा जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या घरी जाता. तिथे तुमची बाजू घेऊन भांडणारा केवळ तुमचा पती असू शकतो, अन्य कोणीही नाही. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवून नणंदेसमोर आपला राग कंट्रोल करायला शिका. एकदा हा ही गोष्ट तुम्ही आत्मसात केली तर तुमचे तिच्याशी वाद होणारच नाही आणि तुम्ही काही बोलत नाही हे पाहून ती देखील वाद घालायला कंटाळेल हे नक्की!

(वाचा :- माझी कहाणी : मी 26 वर्षांची मुलगी आहे व मला लग्न करायचं आहे, पण समाज माझ्या लग्नाला तुच्छ व पाप मानतो कारण…!)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.