म. टा. प्रतिनिधी, नागपूर: कर्जबाजारी झाल्याने दंतचिकित्सकाने चादरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामटेकेनगर येथील कुश अपार्टमेंटमध्ये घडली.काय घडलं?आशिष गणपतराव मुलार (वय ३५) असे मृतकाचे नाव आहे. ते हुडकेश्वरमधील एका खासगी रुग्णालयात सेवा द्यायचे. कर्जबाजारी झाल्याने ते गेल्या काही दिवसांपासून तणावात राहायचे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नी प्रसूतीसाठी माहेरी गेल्या. घरी कोणी नसताना शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. यादरम्यान, त्यांचे मित्र डॉ. योगेश कृष्णा भालेराव (वय ३५, रा. ओमसाईनगर) हे त्यांच्या घरी आले. त्यांनी दार ठोठावलं. मात्र, प्रतिसाद मिळाला नाही. योगेश यांनी जोराने दाराला धक्का मारला. आतील कडी तुटल्याने दार उघडले. आशिष हे त्यांना गळफास घेतलेले दिसले. समोरील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. स्वत:ला सावरत त्यांनी अजनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.माहिती मिळताच अजनी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी आशिष यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी जप्त केली. कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या करीत असल्याची त्यांनी चिठ्ठीत लिहिले आहे. याप्रकरणी अजनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.Read Latest And



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *